(Source: ECI/ABP News/ABP Majha)
26th April Headlines: बारसूमध्ये रिफायनरीविरोधात आंदोलन, किसान सभेचा मोर्चा; आज दिवसभरात
26th April Headlines: मंगळवारी रत्नागिरीत रिफायनरी विरोधी आंदोलन पेटलं होतं. त्याचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने अकोले ते लोणी असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
26th April Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मंगळवारी रत्नागिरीत रिफायनरी विरोधी आंदोलन पेटलं होतं. त्याचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे महसूल मंत्री विखे-पाटील यांच्यासोबत चर्चा निष्फळ ठरल्याने अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने अकोले ते लोणी असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
रत्नागिरी
- बारसू सोलगावमध्ये आंदोलन सुरू असून खासदार विनायक राऊत सकाळी आंदोलकांची भेट घेणार आहेत. - बारसू सोलगावमध्ये आंदोलन सुरू असून खासदार विनायक राऊत सकाळी आंदोलकांची भेट घेणार आहेत. मंगळवारी ग्रामस्थांनी रिफायनरीला मोठा विरोध केला होता. पोलिसांसोबत झटापट झाल्याचे वृत्त होते. रिफायनरी सर्वेक्षणासाठी 22 एप्रिल 2023 ते 31 मे 2023 हा कालावधी ठरवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
मुंबई
- उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेणार आहेत. बारसू प्रकरणावर चर्चा होणार आहे.
- खारघर मधील विवादीत महाराष्ट्र भूषण सोहळा घटनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर आज तातडीच्या सुनावणीची शक्यता.
- शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांनी जामीनासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
- अभिनेता नवाझऊद्दीन सिद्दिकीनं त्याच्या मुलांकरता बायकोविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
अहमदनगर
- अकोले: पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार होणार असून आजपासून पुढचे तीन दिवस शेतकऱ्यांच्या वतीनं अकोले ते लोणी पायी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता अकोले शहरातून या मोर्चाला सुरूवात होणार आहे.
- शिर्डी येथे राज्यपाल रमेश बैस साई मंदिराला भेट देणार असून शेजारती देखील करणार आहेत.
पुणे
- वरवंड येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भाजपचे आमदार राहूल कुल यांच्या विरोधात संध्याकाळी 6 वाजता सभा
- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक. पुण्यात पाणीकपात होणार का हे या बैठकीत ठरणार आहे.
नाशिक
- राज्यपाल रमेश बैस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा आणि दर्शन घेणार आहेत. दुपारी, कालिदास नाट्यगृहात नाशिक एज्युकेशन संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.
दिल्ली
- अन्नाद्रमुक महासचिव आणि तमिळनाडुचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी आज गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौराष्ट्र तमिल संगममच्या समारोह कार्यक्रमाला संबोधित करतील.
- केंद्रीय कॅबिनेटची आज बैठक होणार आहे.