एक्स्प्लोर

23rd July Headline: इर्शाळवाडीत आजही बचावकार्य, राज्यभरात धुवांधार पावसाची शक्यता, आज दिवसभरात

23rd July Headline : आज दिवसभरात घडणाऱ्या पूर्वनियोजित घटनांचा थोडक्यात आढावा

23rd July Headline :  मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली  आहे. हवामान विभागाने आजही काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.  इर्शाळवाडीत आजही बचावकार्य सुरु राहणार आहे, अद्याप 54 जण बेपत्ता आहेत. तर, दुसरीकडे  भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यामध्ये आशिया चषकात लढत होणार आहे. याशिवाय आज दिवसभरात अनेक घडामोडी आहेत. त्याबाबतचा थोडक्यात आढावा घेऊय़ात...

आज पावसाची स्थिती कशी असेल – 

• पालघर, ठाण्यासाठी आज आॅरेंज अलर्ट कायम, काही ठिकाणी अतिवृष्टीचा देखील इशारा 
• मुंबईसाठी आज यलो अलर्ट वर्तवण्यात आलाय.  मुंबईत मध्यरात्री पावसाचा जोर वाढू शकतो असं आयएमडीच्या वैज्ञानिकांनी सांगितलंय.  
• रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील पाचही दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तिन्ही जिल्ह्यांसाठी पाचही दिवस आॅरेंज अलर्ट 
• मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा 
• पुण्यातील घाट परिसरात आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा कायम तर कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज 
• विदर्भात पुढील पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता, आज अमरावती, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळसाठी आॅरेंज अलर्ट 
• उत्तर महाराष्ट्रात देखील धुंवाधार, जळगावसाठी आज आॅरेंज अलर्ट जारी

अनिल पाटील यवतमाळ दौऱ्यावर -
अमरावती - अमरावती जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने मात्र अक्षरशः अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलय..  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आज यांचा दौरा यवतमाळच्या दौ-यावर असतील. सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नैसर्गिक आपत्तीविषयक आढावा बैठकीस उपस्थित राहतील. 

इर्शाळवाडीत बचावकार्य सुरुच, 54 जणांचा शोध सुरु
इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू, अजूनही ५४ जणांचा शोध सुरूच, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, तिसऱ्या दिवशीही बचावकार्य थांबवलं होतं. आज पुन्हा बचावकार्य सुरु होणार आहे. 

युपीएससी आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यासाठी आज राज ठाकरे सकाळी ११ वाजता  जे. के. बॅक्वेट, प्रभादेवी येथे उपस्थित राहणार आहेत.

वाराणसी - वाराणसी येथे देशभरातील मंदिराचे महाकुंभ प्रदर्शन आयोजित करण्यात आलय. आज या कार्यक्रमाला आज दुपारी 3.30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. 
 
 भारत-पाकिस्तान फायनल -

कोलंबो - इमर्जिंग एशिया कपच्या फायनलमध्ये आज भारत अ संघ त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान अ संघाविरुद्ध जेतेपदासाठी खेळेल. भारतीय संघ चांगल्या फॉर्ममुळे तो या सामन्यातील विजयाचा दावेदार मानलं जात आहे.

पुणे - अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

चंद्रपूर - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आज चंद्रपूरात आहेत. सकाळी 9 वाजता दाताळा येथील अग्रसेन भवन मध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठकीला उपस्थित राहतील. त्यांच्या या सभेला विरोध करण्याचा उलगुलान संघटनेने इशारा दिला आहे, ते कार्यक्रम स्थळाच्या जवळ सकाळी 10 वाजता प्रदर्शन करण्याची शक्यता आहेत.

शिर्डी  - मनसेच्या महासंपर्क अभियानांतर्गत विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज शिर्डी शासकीय विश्राम गृह येथे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यापुर्वी अमित ठाकरे साईचं दर्शन घेतील. 

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget