एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

23rd August Headlines: चांद्रयान-3चं चंद्रावर लँडिंग, महाविकास आघाडीची बैठक; आज दिवसभरात

23rd August Headlines: आज चांद्रयान-3चं चंद्रावर लँडिंग होणार आहे, तर इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.

23rd August Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज बहुप्रतिक्षित भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचं चंद्रावर लँडिंग होणार आहे, तर इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. कांद्याच्या वाढीव निर्यात शुल्काविरोधात नाशिकमधील कांदा लिलाव सलग तिसऱ्या दिवशी ठप्प असणार आहे.

अवघ्या काही मिनिटांत चांद्रयान-3चं चंद्रावर लँडिंग

संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रयान 3 चंद्रावर लँड होणार आहे. चांद्रयान–3 चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करणार आहे. चांद्रयान-3 चं लँडर मॉड्यूल चंद्रावर सॉफ्ट लँड करेल. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागापासून 25 किमीवर आहे आणि ताशी 6 हजार किमीवरुन त्याचा वेग शून्यावर आणला जाईल. MOX/ISTRAC वरून चांद्रयान-3 चंद्राच्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण आज संध्याकाळी 5.27 पासून सुरू केलं जाईल. 'सॉफ्ट-लँडिंग'चं थेट प्रक्षेपण ISRO ची वेबसाईट, त्यांचं YouTube चॅनल, ISRO चृं Facebook पेज आणि DD National TV चॅनल यासह अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

कांद्याच्या वाढीव निर्यात शुल्काविरोधात नाशिकमधील कांदा लिलाव ठप्प

कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प असून सकाळी 10 वाजता केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा व्यापारी, शेतकरी प्रतिनिधी, नाफेड आणि सरकारी अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दोन दिवसात जवळपास 45 ते 50 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली बैठक निष्फळ ठरली होती.

इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक

महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या दिवशी इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडणार आहे, त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून 23 ऑगस्टच्या बैठकीमध्ये तयारी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे. 

भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज ठाकरे गटात प्रवेश

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थित प्रवेश होणार आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार असणार अशी चर्चा सुरु आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सध्या ते भाजपमध्ये होते, त्यांनी 2019 ला तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती. वाकचौरे यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रामदास आठवलेंचा पराभव केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sub District Election Officer On EVM : मतं पडताळणीची नेमकी प्रक्रिया काय? कोण करु शकतो अर्ज?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 02 December 2024Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 2100 यंदा नाही तरी पुढील वर्षी..?Solapur Election News : EVM वर आक्षेप, बॅलेट पेपरवर निवडणूक घेणाऱ्या मारकडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Australia vs India, 2nd Test : टीम इंडियासमोर अडचणी वाढल्या, ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का संघात परतला
टीम इंडियासमोर अडचणी वाढल्या, ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का संघात परतला
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
Embed widget