एक्स्प्लोर
Advertisement
2009 सालचा आदिवासी विकास विभागातील घोटाळा, कारवाईला सुरुवात
मंगळसूत्र खरेदीत अपहार असो, वा लाभार्थी आदिवासींना गायी-म्हशी खरेदीतील गोंधळ. शासनाने नेमलेल्या न्या. गायकवाड समितीच्या अहवालावर कारवाई सुरु झाली आहे.
गडचिरोली : आदिवासी विकास विभागातील 2009 साली गाजलेल्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाईला सुरुवात झाली आहे. मंगळसूत्र खरेदीत अपहार असो, वा लाभार्थी आदिवासींना गायी-म्हशी खरेदीतील गोंधळ. शासनाने नेमलेल्या न्या. गायकवाड समितीच्या अहवालावर कारवाई सुरु झाली आहे.
गडचिरोलीचे तत्कालीन आदिवासी प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांच्याविरोधात सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिकचा अपहार केल्याची तक्रार विभागानेच दाखल केली आहे. यामुळे आदिवासी विकास विभाग हादरला आहे.
राज्य सरकारने आदिवासी विकास विभागात झालेल्या अपहाराची चौकशी करण्यासाठी न्या. गायकवाड समितीची नेमणूक केली होती. राज्यभरातील या चौकशीचं एक टोक गडचिरोलीत देखील होतं.
गडचिरोली आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात झालेल्या अपहार प्रकरणी आता कारवाई सुरु झाली आहे. 2004 ते 2009 या काळातील अपहाराबाबत स्पष्ट खुलासा न्यायमूर्तींच्या समितीने केला होता. त्यानुसार तत्कालीन अधिकारी हरिराम मडावी यांच्याविरोधात एक कोटी 52 लाख 60 हजार रुपयांच्या अपहाराची तक्रार आदिवासी विकास विभागाने दिली आहे.
विद्यमान सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. शासनाने नेमलेल्या न्या. गायकवाड समितीने पाच योजनांच्या अंमलबजावणीत ठपका ठेवला होता. याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
अपहार झालेल्या योजना
HDPE पाईप योजना अपहार : 81 लाख रुपये
मंगळसूत्र पुरवठा अपहार : 18 लाख 20 हजार रुपये
कीटकनाशक, स्प्रे पंप अपहार : 6 लाख 97 हजार रुपये
गायी, म्हशी, शेळी खरेदी अपहार : 44 लाख 80 हजार रुपये
साउंड सर्विस टेन्ट पुरवठा अपहार : 1 लाख 63 हजार रुपये
2009 साली झालेल्या या अपहाराबाबत चौकशी आणि कारवाईचं सत्र सुरु झालं आहे. त्यामुळे अपहार करुन अद्याप आपल्या जागी स्थानापन्न असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे. राज्यभर आदिवासी विकास विभागात खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement