एक्स्प्लोर
Advertisement
नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात २ पोलीस गंभीर जखमी
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यात एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
पोलिस निरीक्षक अतुल तावडे आणि हवालदार राजेश चाबर अशी त्यांची नावे आहेत. कोरची पकनाभट्टी इथं नक्षलवाद्यांनी बॅनर लावले होते. हे बॅनर काढायला पोलिसांचा फौजफाटा गेला असता मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला नेण्यात आलं आहे.
दरम्यान, या स्फोटासाठी नक्षलवाद्यांनी जुनीच मोडस ऑपरेंडी वापरली आहे. पोस्टर लावून ते काढण्यास पोलीस आल्यास स्फोट घडवणं ही नक्षलवाद्यांची जुनची पद्धत आहे. आज देखील नक्षलवाद्यांनी ही पद्धत अवलंबली. ज्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले. त्यामुळे आता घटनेची पोलीस कसून चौकशी करत असून स्फोट घडवणाऱ्या नक्षलवाद्यांचाही शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement