एक्स्प्लोर

19th July Headline: विधिमंडळ अधिवशेनाचा तिसरा दिवस , भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात भिडणार ; आज दिवसभरात

19th July Headline : भंडाऱ्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात महिला काँग्रेस आंदोलन करणार आहेत. तर मनमाडमध्ये कांदा अनुदान प्रश्नी कांदा उत्पादकांकडून फोन आंदोलन करण्यात येणार आहे.

19th July Headline :   राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनामध्ये कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व पक्षीय नेत्यांची बैठक पार पडणार आहे. कोकणासह रायगड पुण्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या दसरा मेळाव्याविरोधात दाखल जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. 

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. मंगळवारी विरोधकांनी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. तर, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांकडून देण्यात येत असलेल्या उत्तरांवर नाराजी व्यक्त केली होती. आजही विधिमंडळ अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

गुरुवार (20 जुलै) पासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीचं आयोजन आज करण्यात आलं आहे. 

मनमाडमध्ये कांदा अनुदान प्रश्नी फोन आंदोलन 

 महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांना कांदा अनुदान प्रश्न विचारण्यासाठी 'फोन आंदोलन' करण्यात येणार आहे.  या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक शेतकरी मंत्री आणि आमदारांना कॉल करणार आहेत.

किरीट सोमय्यांच्या विरोधात भंडाऱ्यात महिला काँग्रेसचं आंदोलन

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरुद्ध भंडाऱ्यात महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील त्रिमूर्ती चौकातील या आंदोलनात शेकडो महिला सहभागी होणार आहेत. 

राज्यात अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोकणात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. रायगड आणि पुण्यातील घाट माथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पालघर, सातारा, पुणे आणि रायगडसाठी आज रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील 24 तास विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. तसेच विदर्भात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्या 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीत भरवलेल्या दसरा मेळाव्यात खर्च केलेल्या निधीविरोधात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील आस्थापनांच्या पाट्या मराठीत नसल्याची तक्रार करत गुजराती विचार मंचतर्फे हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 

इमर्जिंग एशिया कप 2023 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान लढत

इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारताने निर्वादित वर्चस्व मिळवले आहे. आतापर्यंत दोन्ही सामन्यात बाजी मारत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत होणार आहे.  भारत आणि पाकिस्तान संघ ब गटात आहेत. हे दोन्ही संघ ब गटात आघाडीवर आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
Beed Crime : बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Video : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 30 March 2025100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान 30 March 2025Prashant Koratkar Case :  प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनासाठी लगेच अर्ज करणारABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 30 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
Beed Crime : बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Video : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Nepal Protest : 'राजा आणा, देश वाचवा' नेपाळमध्ये जी राजेशाही हद्दपार केली तीच परत आणा अशी मागणी करत लोकं रस्त्यावर का उतरले?
'राजा आणा, देश वाचवा' नेपाळमध्ये जी राजेशाही हद्दपार केली तीच परत आणा अशी मागणी करत लोकं रस्त्यावर का उतरले?
Shirdi News : साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
Ahilyanagar News : 'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
'तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही', नवरदेवानं मोडलं लग्न; नवरीनं उचललं टोकाचं पाऊल, अहिल्यानगर हादरलं!
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
नाही तर मी डायरेक्ट येऊन छातीत गोळ्या घालतो, मारणाऱ्याला सुद्धा 25 लाख देणार; थेट खासदारालाच करणी सेनेची जीवे मारण्याची धमकी
Embed widget