एक्स्प्लोर
नियमबाह्य 19 लाख बदलले, 4 बँक कर्मचारी निलंबित

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या 4 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नियमबाह्य पद्धतीनं पैसे बदलून दिल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. उदगीरच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील विकास कदम या कॅशियरसोबत 3 कॅशियर्स निलंबित करण्यात आले आहेत. एका व्यापाऱ्याला पैसे बदलण्यासाठी डमी खातेदार उभा करुन 19 लाखांची रक्कम बदलण्यात आली आहे. 19 लाख रुपये नियमबाह्य पद्धतीनं बदलून दिले म्हणून बँक ऑफ़ महाराष्ट्रच्या मुख्यशाखेनं ही कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रिझर्व बँकेसह आयकर खात्यानंही देशभरात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवलं आहे. दरम्यान देशभरात समोर आलेला हा पहिलाच प्रकार असल्याचंही बोललं जात आहे.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















