एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यभरात बारावीची परीक्षा, 15 लाख 5 हजार विद्यार्थ्यांची कसोटी
मुंबई : राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. राज्यभरातून सुमारे 15 लाख 5 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यंदा मुंबई विभागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6 टक्क्यांनी वाढली आहे.
राज्यातील एकूण 9 हजार 143 ज्युनिअर कॉलेजातील विद्यार्थी ही परीक्षा देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील 2 हजार 710 केंद्रांवर ही परीक्षा होईल.
या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात सात भरारी पथक नेमण्यात आलेत. तर कॉपी रोखण्यासाठी एकूण 252 पथकं सज्ज आहेत.
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन
- मुंबई 0२२- २७८९३७५६,
- पुणे 0२0- ६५२९२३१६,
- नागपूर 0७१२- २५५३५0७,
- औरंगाबाद 0२४0- २३३४२२८,
- नाशिक 0२५३- २५९२१४३,
- कोल्हापूर 0२३१- २६९६१0३,
- अमरावती 0७२१- २६६२६0८,
- लातूर 0२३८२- २२८५७0,
- कोकण 0२३५२- २३१२५0
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement