एक्स्प्लोर

11वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा आजचा शेवटचा दिवस

मुंबई: मुंबईतील ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 27 जूनला प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, शिक्षण विभागाकडून दोन दिवस वाढून 29 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्जात मुंबईत तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी त्रास झाला होता. दरम्यान, मुदत वाढवण्यात आली असली तरी पुढील वेळापत्रकात शिक्षण विभागाकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे कला आणि क्रीडा कोट्यातील गुण अपलोड झाले नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ उडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक! सर्वसाधारण यादी जाहीर होण्याची तारीख – 30 जून, संध्याकाळी 5 वाजता अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची तारीख – 1 ते 3 जुलै, संध्याकाळी 5 वाजता * पहिली यादी पहिली गुणवत्ता यादी – 7 जुलै, सायंकाळी 5 वाजता पूर्ण फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 8, 10, 11 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत * दुसरी यादी दुसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख – 12 ते 13 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुसरी गुणवत्ता यादी – 17 जुलै, संध्याकाळी 5 वाजता फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 17 ते 19 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता * तिसरी यादी तिसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंती क्रम बदलण्याची तारीख – 20 ते 21 जुलै, संध्याकाळी 5 वाजता तिसरी गुणवत्ता यादी – 25 जुलै, संध्याकाळी 5 वाजता फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 26 ते 27 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता * चौथी यादी – चौथ्या यादीसाठी आवश्यक असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख – 28 ते 29 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत – चौथी गुणवत्ता यादी – 1 ऑगस्ट, संध्याकाळी 5 वाजता – फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 2 ते 3 ऑगस्ट, सकाळी 10 ते 5 वाजता कट ऑफमध्ये वाढ होण्याची शक्यता यंदा मुंबईतील पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही आहेत. तर 10 हजार 157 विद्यार्थ्यांना 90 आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यातही 95 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी यंदाच्या नामांकित कॉलेजची सायन्सची कटऑफ 93 टक्क्यांपर्यंत बंद होण्याचा अंदाज आहे. अकरावी प्रवेशाबाबत ए टू झेड माहिती अकरावीच्या उपलब्ध जागा – अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा – 1 लाख 32 हजार 408 – ऑनलाईन प्रवेश – 1 लाख 59 हजार 682 – एकूण जागा – 2 लाख 92 हजार 90 2016 मधील कट ऑफ कला : जास्तीत जास्त 94.4% ते कमीत कमी 80% वाणिज्य : जास्तीत जास्त 94.5 % ते कमीत कमी 89.8% विज्ञान : जास्तीत जास्त 93.2 % ते कमीत कमी 91%
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget