एक्स्प्लोर

सदरक्षणाय खलनिग्रहणाय! तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील 11 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक

Maharashtra Police : देशभरातील 151 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकानं सन्मानित करणार आहे. यावेळी तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 11 पोलिसांना पदक जाहीर करण्यात आलं आहे.

Maharashtra Police, MHA Awards 2022 भारताचा 75 वा स्वांतत्र्य दिवस यंदा साजरा केला जाणार आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंधाखाली पार पडल्यानंतर यंदा स्वांतत्र्य दिनादिवशी विविध पुरस्कारांची वाटप केली जाणार आहे. दरम्यान वर्ष 2022 साठी केंद्रीय गृहमंत्री पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी विविध गुन्ह्यांच्या तपासांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 11 पोलिसांना पदक जाहीर झालं आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 2022 वर्षासाठी 'केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास' पदक शनिवारी जाहीर करण्यात आले. यावेळी देशभरातील 151 पोलिसांना पदक मिळणार असून यामध्ये 11 राज्यातील पोलिसांचा समावेश आहे. 

'हे' आहेत 11 मानकरी

केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झालेले पोलीस अधिकारी पुढीलप्रमाणे-

  1. कृष्णकांत उपाध्याय, उपपोलीस आयुक्त
  2. प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक
  3. मनोज मोहन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक
  4. दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक
  5. अशोक तानाजी विरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
  6. अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
  7. राणी तुकाराम काळे, सहाय्यक निरीक्षक
  8. दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक
  9. सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक
  10. जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक
  11. समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक 

2018 पासून दिला जातो पुरस्कार

विविध गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आणि तपासातील अशा उत्कृष्टतेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची सुरूवात 2018 वर्षीपासून करण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. यासह केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे (सीबीआय)15, मध्य प्रदेशमधून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, उत्तर प्रदेशातून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, केरळमधून 8 पोलीस, राजस्थानमधून 8 पोलीस, पश्चिम बंगालमधून 8 आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासीत प्रदेशाताल पोलिसांचाही समावेश आहे.  28 महिला पोलिस अधिकाऱ्यांचा देखील यात समावेश आहे.  

गेल्या वर्षी 152 पोलीस कर्मचार्‍यांचा गौरव

गेल्या वर्षी म्हणजेच 2021 साली 152 पोलीस कर्मचार्‍यांना उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदकं प्रदान करण्यात आलं होतं. 2021 मध्ये हे पुरस्कार मिळालेल्या कर्मचार्‍यांमध्ये सीबीआयचे 15, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांचे प्रत्येकी 11, उत्तर प्रदेशचे 10, केरळ आणि राजस्थान पोलिसांचे नऊ, तामिळनाडू पोलिसांचे आठ, बिहारचे सात, गुजरातमधील प्रत्येकी सहा पोलिसांचा समावेश आहे.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय, तब्बल 23 वर्षांनंतर 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार 
महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय, तब्बल 23 वर्षांनंतर 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार 
आयुष्यात बाळासाहेब ठाकरेंचं फार मोठं स्थान, घरी बोलावून त्यांनी मला पदं दिली : नारायण राणे
आयुष्यात बाळासाहेब ठाकरेंचं फार मोठं स्थान, घरी बोलावून त्यांनी मला पदं दिली : नारायण राणे
Narayan Rane : नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस; मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने, 74 वा वाढदिवस उत्साहात साजरा
नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस; मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने, 74 वा वाढदिवस उत्साहात साजरा

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget