एक्स्प्लोर

लॉर्ड्सच्या मैदानावर भारताचा पहिला कसोटी विजय, इस्त्रायलने अरबांचा युद्धात दारुण पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना; आज इतिहासात

On This Day In History: अरब-इस्त्रायल देशांमध्ये लढलेल्या सहा दिवसांच्या युद्धात (Arab–Israel War) इस्त्रायलने तीन अरब देशांच्या आघाडीला पाणी पाजलं आणि ऐतिहासिक असा विजय मिळवला. 

10th June In History: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 10 जूनला ऐतिहासिक असं महत्त्व आहे. हा तोच दिवस आहे जेव्हा भारतीय संघाने पहिल्यांदा लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामना जिंकला होता. 10 जून 1986 रोजी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा आज स्थापना दिवस आहे. 10 जून 1999 रोजी शरद पवारांनी तारिक अन्वर आणि पीए संगमा यांच्या मदतीने या पक्षाची स्थापना केली होती. 

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 10 जून या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे,

1246: नसिरुद्दीन मुहम्मद शाह दिल्लीचा पहिला शासक बनला. यापूर्वी दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन मसूद शाह हद्दपार झाला होता.

1829: ऑक्सफर्ड आणि ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठादरम्यान पहिली बोट शर्यत.

1848: न्यूयॉर्क आणि शिकागो दरम्यान पहिली टेलिग्राफ लिंक सुरू झाली.

1931: नॉर्वेने पूर्व ग्रीनलँडला जोडले.

1934: सोव्हिएत युनियन आणि रोमानिया यांच्यातील राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.

1940: दुसऱ्या महायुद्धात इटलीने फ्रान्स आणि ब्रिटनविरुद्ध युद्ध घोषित केले.

1946: राजेशाही संपल्यानंतर इटली हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले.

1967: इस्त्रायलने अरब राष्ट्रांना पाणी पाजलं, सहा दिवसांचं युद्ध जिंकलं 

इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावावर 10 जून 1967 रोजी युद्धविराम स्वीकारून सहा दिवसांचे अरब युद्ध संपवले. यावेळी इस्रायलने यहुदी, ख्रिश्चन आणि मुस्लिमांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या जेरुसलेमवर पूर्णपणे ताबा मिळवला. इस्त्रायल आणि अरब देशांमध्ये झालेल्या सिक्स डेज वॉर म्हणजे सहा दिवसांच्या युद्ध (Six-Day War) हे 5 जून 1967 रोजी सुरू झालं आणि ते 10 जून 1967 रोजी संपलं. यावेळी इस्त्रायल्या सैन्याने जेरुसलेममध्ये प्रवेश केला. सहा-दिवसीय युद्ध हे जून युद्ध या नावानेही ओळखले जाते. 1967 अरब-इस्त्रायली युद्ध किंवा तिसरे अरब-इस्रायल युद्ध (Arab–Israeli War or Third Arab–Israeli War) हे इस्रायल आणि अरब राष्ट्रांच्या म्हणजे इजिप्त, सीरिया आणि जॉर्डन यांच्यात लढले गेले. यामध्ये सुरुवातील मागे पडलेल्या इस्त्रायलने नंतर मुसंडी (Israel–Palestine conflict)  मारून तीनही अरब देशांचा दारून पराभव केला होता. 

या सहा दिवसांच्या युद्धात इस्त्रायलने सिरिया (Syria) देशाच्या ताब्यातील गोलन हाई्टस (Golan Heights), जॉर्डन (Jordan) या देशाकडून वेस्ट बँक (the West Bank) आणि इजिप्तकडून (Egypt) गाझा स्ट्रिप (Gaza Strip) आणि सिनाई पेनिन्सुला (Sinai Peninsula) हे प्रदेश जिंकून घेतले. 

1971: अमेरिकेने चीनवरील 21 वर्षांचा व्यापार निर्बंध संपवला

1972: मडगाव बंदर, मुंबई येथून हर्षवर्धन हे संपूर्ण वातानुकूलित जहाज सुरू करण्यात आले.

1986 : लॉर्ड्सच्या मैदानावर भारताचा पहिला ऐतिहासिक कसोटी विजय 

10 जून 1986 रोजी भारतीय संघाने (Team India) पहिल्यांदाच इंग्लंडच्या लॉर्ड्स (Lord's Cricket Ground) या मैदानावर पहिला कसोटी सामना जिंकला होता. कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला. लॉर्ड्सला 'क्रिकेटची मक्का' म्हटले जाते आणि तिथे जिंकणे म्हणजे क्रिकेटच्या हज यात्रा करण्यासारखं आहे. 1986 मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला तेव्हा पहिल्याच कसोटी सामन्यात संघाला असा अनपेक्षित विजय मिळेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 294 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघ पहिल्या डावात 341 धावांवर गारद झाला होता. यानंतर इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या डावात 180 धावांवर बाद झाले. अशा परिस्थितीत भारताला सामना जिंकण्याची मोठी संधी होती आणि दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 136 धावांचे लक्ष्य गाठून इतिहास रचला.

1999 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी मतभेद वाढले. याची परिणिती शेवटी काँग्रेसच्या फुटीमध्ये झाली. शरद पवार (Sharad Pawar), पीए संगमा (PA Sangma) आणि तारिक अन्वर (Tariq Anwar) या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसला रामराम करून 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना (NCP Foundation Day) केली. नंतरच्या काळात समान विचारधारेच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने काँग्रेसच्या यूपीएमध्ये (UPA) सहभाग घेतला. स्थापनेच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने महाराष्ट्रात काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली . शरद पवार हे स्थापनेपासून आतापर्यंत या पक्षाचे अध्यक्ष आहेत. 

2002: पाकिस्तानने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखर K-2 चे नाव बदलून 'शाहगौरी' केले.

2003: यूएस स्पेस एजन्सी नासाचे मंगलयान रोव्हर प्रक्षेपण.

2021: कवी, प्राध्यापक आणि चित्रपट निर्माते बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन.

2021: आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता डिंको सिंग यांचे निधन.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget