एक्स्प्लोर
Advertisement
कोविड संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, राज्यात आतापर्यंत 1 लाख 36 हजार गुन्हे
लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर 188 नुसार कारवाई आतापर्यंत करण्यात आली असून एक लाख 36 हजार 268 गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र राज्यात करण्यात आली आहे. तर 27 हजार 721 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरला आणि तो नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि तो कुठेतरी नियंत्रणात यावा म्हणून 22 मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली गेली. मात्र काही नियम कायम ठेवले आहेत. लॉकडाऊनबाबत नियम मोडणाऱ्यांना वर कलम 188 नुसार कारवाई सुद्धा करण्यात आली जो आकडा आता एक लाखांच्या वर गेला आहे.
लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर 188 नुसार कारवाई आतापर्यंत करण्यात आली असून एक लाख 36 हजार 268 गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र राज्यात करण्यात आली आहे. तर 27 हजार 721 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 9 कोटी 18 लाख 3 हजार 218 रुपयांचा दंडही आतापर्यंत आकारण्यात आलेला आहे. त्यामुळे करणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर पावलं उचलली असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
कोविड वॉरियर्सवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई
कोरोनाव्हायरसला आतापर्यंत आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी डॉक्टर, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी आणि पोलिस हे अहोरात्र झटत आहे. या सर्वांना कोरोना योद्धा किंवा कोरोना वॉरियर म्हणून सुद्धा संबोधलं जात आहे. आणि अशा कोरोना वॉरियर्सवरसुद्धा या लॉकडाऊनमध्ये हल्ले झाले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला करण्याच्या 285 घटना घडल्या आहेत. त्यामध्ये 860 जणांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई केली जात आहे आहे.
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,04,724 फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंन्टाईन असा शिक्का आहे, अशा 746 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 4,69,275 व्यक्ती क्वारंन्टाईन आहेत. तसेच या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1335 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले, असून हे 84887 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 36 पोलीस व 1 अधिकारी अशा एकूण 37, पुणे 3, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3, एटीएस 1, मुंबई रेल्वे 2, ठाणे 2 पोलीस व ठाणे ग्रामीण 1अधिकारी 2, जळगाव ग्रामीण 1,पालघर 1, जालना पोलीस अधिकारी 1, उस्मानाबाद 1 अशा 57 पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या 105 पोलीस अधिकारी व 871 पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement