Maharashtra Weather Update: राज्यभरात पुन्हा कोसळ'धार'! मुंबईसह उपनगरांसाठी येलो अलर्ट, तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; संपूर्ण महाराष्ट्रासाठी IMD चा अंदाज काय?
Maharashtra Heavy Rain : राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरसह विदर्भ, कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे.

Maharashtra Heavy Rain : राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरसह विदर्भ, कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे. अशातच मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज मुंबई आणि उपनगरांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड जिल्ह्याला आज सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, काही भागात पावसाची रिमझिम सुरू असून पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
दुसरीकडे मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाने हजेरी लावल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांना पावसाचा सामना करावा लागतो आहे. तर या मुसळधार पावसाचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील नेहमीचा जलमय होणारा हिंदमाता चौक येथे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मात्र महानगरपालिकेच्या सक्षम मशिनरीच्या मदतीने ते पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी इशारा
दरम्यान, पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच, वाऱ्याचा वेग देखील 30-40 किमी प्रति तास राहण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आली आहे. संभाव्य अलर्ट लक्ष्यात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.
महाबळेश्वर रोडवर रात्री भूस्खलन; आंबेनळी घाटातील रस्त्यावर दगड माती वाहून आली
Raigad Rain : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात असणाऱ्या कापडे गावाजवळ रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही भागात भूस्खलन झाल्याची घटना घडली . त्यामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक कोलमडून पडली होती मात्र प्रशासनाच्या प्रसंगावधानने तात्काळ यंत्रसामग्री व कामगारांची मदत घेत ही माती मोकळी करण्यात आली आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना गाडीतून उतरवलं
वडाळा स्टेशन जवळ मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मनोरेल थांबवण्यात आली. मोनोरेल पुढील स्टेशनवर आणण्यात आली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. वडाळा परिसरात तांत्रिक कारणामुळे बंद पडलेल्या मोनोमध्ये 17 प्रवासी होते. मोनोरेल बंद पडताच त्यांना दुसऱ्या मोनोमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. कपलिंग करून मोनोरेलला कारशेड नेण्यात येत आहे. त्याठिकाणी तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल. प्रवाशांना दुसऱ्या मोनो मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. सकाळी पावणेआठ वाजता हा तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आले आहे.
ही बातमी वाचा:























