एक्स्प्लोर

Unseasonal Rain: वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं मराठवाड्याला झोडपलं; रब्बी पिकांसह फळ बागांना मोठा फटका, बळीराजा हवालदिल! 

Maharashtra Weather Update  : मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं अक्षरक्ष: झोडपलंय. या अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आहे.

Maharashtra Weather Update  : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर पुढील काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain) अजून गडद होण्याची शक्यता आहे. अशातच मराठवाड्यातील अनेक भागाला वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं अक्षरक्ष: झोडपलंय. यात हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये काल (3 एप्रिल) सायंकाळच्या सुमारामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह  अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. 

या अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आहे. वाई  गोरक्षनाथ गावाच्या शिवारामध्ये प्रल्हाद  जाधव या शेतकऱ्यांने पाच एकरवर पपईच्या बागेची लागवड केली होती. त्यातील पाच एकरमध्ये चार हजार पपईच्या  झाडांची लागवड करत असताना त्यांना सहा लाख रुपये खर्च आला होता. आता प्रत्येक आठवड्याला पपईची फळ विक्री केली जात होती. परंतु काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे संपूर्णपणे पपईची फळबाग जमीन दोस्त झाली आहे. काहीच वेळात शेतकऱ्याच्या पपईच्या बागेच होत्याच नव्हतं झालंय. विक्रीलायक तयार झालेली पपईची फळ तुटून जमिनीवर पडली आहेत  शेतकरी प्रल्हाद जाधव यांना पपईच्या बागेमधून वीस लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होतं. परंतु आता झालेल्या वादळ आणि अवकाळी पावसाने संपूर्णपणे शेत उध्वस्त झाले आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार शिरीष नाईक यांनी केली पाहणी

दरम्यान, नंदुरबारच्या अनेक भागातही वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार शिरीष नाईक यांनी पाहणी केलीय. आमदार नाईक यांनी ठाणेपाडा आणि परिसरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत माहिती जाणून घेतली. तसेच लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना आदेश ही यावेळी दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत  उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांनी केली आहे.

नाशिक शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने सातपूर फिडर सब स्टेशनमध्ये बिघाड झाल्यान आज (4 मार्च) महावितरणच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. देखभाल दुरुस्तीमुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने केला जाणार आहे. आधीच शहरात पाणी टंचाई जाणवत असताना त्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.

हे ही वाचा 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget