एक्स्प्लोर

Unseasonal Rain: राज्यात अवकाळी पावसाचा कहर! रब्बी पिकांना मोठा फटका; शेतकर्‍यांचा तोंडचा घास हिरावला

Maharashtra Weather Update: ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. तर एप्रिलचा पहिल्या आठवड्यातील  काही दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे.

Unseasonal Rain : ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. तर एप्रिलचा पहिल्या आठवड्यातील  काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain) अजून गडद होण्याची शक्यता आहे. अशातच अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. बाळापुर तालुक्यातल्या कांदा आणि केळी उत्पादक शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसलाय. बाळापुर तालुक्यातल्या तामशी गावात कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय. काढणी करून कापण्यासाठी ठेवलेला शेतातला कांदा अक्षरशः अवकाळी पावसाच्या पाण्याने भिजलाय. यात जवळपास हजारो क्विंटल कांद्याचं नुकसान झालं आहे. 

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अकोल्यात अवकाळी पावसानं काल (1 एप्रिलच्या) रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे. यात कांदा आणी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. बाळापुर तालुक्यात रात्री अवकाळी पावसाचा कहर होता. याशिवाय सोबत वारा देखील वाहत होता. या वाऱ्यामुळे अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. वाऱ्यामुळं केळीची झाडं पडल्याने केळीचे घड अक्षरश: मातीत भिजल्या गेलेय. यात शेतकऱ्यांच एकरी जवळपास 35 ते 40 टक्के  नुकसान झालंय. अवघ्या दोन दिवसांवर केळी कापण्यावर आली होती, मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांकडं ऐनवेळी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवलीय. अमोल काळे यांच्या शेतातील जवळपास साडेचार एकर पैकी दीड एकर केळीचे नुकसान झालं आहे.

कांदा उत्पादक शेतकरीही संकटात 

तर अशीच परिस्थिती जिल्ह्यातील कांदा उत्पादकांची झालीय. यासोबतच अवकाळी पावसाचा तडाखा आता जनावरांना बसलाय. या पावसात शेतकऱ्यांच्या मेंढ्या भिजल्याने आजारी पडल्या आहेत. त्यामुळे मेंढापालन करणारे शेतकरी चिंतेत पडलेय.

अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

जालन्यात देखील अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका बसला आहे. यात काढणीस आलेला गहू आणि मका पिकाचं मोठं  नुकसान झालंय. जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने गहू आणि मका पिकाच नुकसान झालं आहे. तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील मक्का आणि गहू पिकाच मोठा नुकसान झालं आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे गहू आणि मक्का पिकाच मोठ नुकसान झालं. यामुळे काढणीला आलेला गहू आणि मका पीक अवकाळी पावसामुळे आडवं झाल्याचं पाहायला मिळाले,

दरम्यान या बेमोसमी अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

हे ही वाचा 

विशाल देवकर 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: उत्तरप्रदेशात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? आगामी २-४ दिवसात होणार फेरबदल 
Maharashtra Live Blog Updates: उत्तरप्रदेशात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? आगामी २-४ दिवसात होणार फेरबदल 
Asaduddin Owaisi on Nashik TCS Case: निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने लपवलं हे कसं समजलं? व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे शिक्षा होते का? TCS प्रकरणावर ओवैसींचा परखड सवाल
निदा खानला एमआयएमच्या नगरसेवकाने लपवलं हे कसं समजलं? व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे शिक्षा होते का? TCS प्रकरणावर ओवैसींचा परखड सवाल
Pune Crime News: कामावर पहिलाच दिवस; मुलींना पाण्याची टाकी दाखवतो म्हणून गेला अन्...; उच्चभ्रू सोसायटीत वॉचमनचं अल्पवयीन मुलींसोबत घृणास्पद कृत्य
कामावर पहिलाच दिवस; मुलींना पाण्याची टाकी दाखवतो म्हणून गेला अन्...; उच्चभ्रू सोसायटीत वॉचमनचं अल्पवयीन मुलींसोबत घृणास्पद कृत्य
शरद पवारांचे म्हणणे खरे करुन दाखवले; विकास लवांडेंवरील हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, दावनेंकडूनही निषेध
शरद पवारांचे म्हणणे खरे करुन दाखवले; विकास लवांडेंवरील हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, दावनेंकडूनही निषेध

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कन्या कॉ. शांताबाई साठे यांचं निधन; 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, शेटवपर्यंत जपला स्वाभीमान
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कन्या कॉ. शांताबाई साठे यांचं निधन; 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, शेटवपर्यंत जपला स्वाभीमान
शरद पवारांचे म्हणणे खरे करुन दाखवले; विकास लवांडेंवरील हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, दावनेंकडूनही निषेध
शरद पवारांचे म्हणणे खरे करुन दाखवले; विकास लवांडेंवरील हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, दावनेंकडूनही निषेध
Misssing Link Mumbai Pune Traffic : ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
शरद पवार आजारातून बाहेर, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड; भाषणात म्हणाले, आपण कुठं कमी पडलो ते...
शरद पवार आजारातून बाहेर, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड; भाषणात म्हणाले, आपण कुठं कमी पडलो ते...
सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार
सुरज बोर्डात चमकला; 10 वीच्या परीक्षेत पठ्ठ्याला 35 टक्के गुण; आई-वडिल खुश, ग्रामस्थांकडून सत्कार
Vikas Lawande and Sangram Bhandare: शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही'
शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही'
Asaduddin Owaisi on Nashik TCS Case: ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीच कट!
ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीच कट!
Eknath Shinde and PM Modi: शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
Embed widget