एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update: उष्णतेनं शहरं तापली! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा पारा 41.2 अंशावर; हवामान विभागाचा अंदाज काय? 

Maharashtra Weather:  मार्चच्या पहिल्या आठवड्यातच यवतमाळचा उन्हाचा पारा 41.2 अंशावर गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मार्च ते मे हे महिना अधिक अवघड जाणार असल्याचे सांगितलं जातंय.  

Maharashtra Weather: राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला समोर जावं लागत आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे. अशातच विदर्भातील अनेक जिल्ह्यात उन्हाळ्याच्या (IMD Forecast) सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. तर उष्णतेनं अंगाची लाहीलाही होत असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यातच यवतमाळचा उन्हाचा पारा 41.2 अंशावर गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मार्च ते मे हे महिना अधिक अवघड जाणार असल्याचे सांगितलं जातंय.  

मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा पारा 41.2 अंशावर

मार्च महिन्यातच यवतमाळकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. सध्या सूर्य आग ओकू लागला असून शहराचा पारा 41.2 सेल्सिअस अंशावर पोहोचला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 41 अंशावर पारा हा एप्रिलच्या  शेवटी आणि मे महिन्यात जात असतो. मात्र, तपमान 41 अंशावर मार्च महिन्यातच गेल्याने यावर्षी मार्च ते मे महिन्यात तापमान चांगलीच वाढ होण्याचे संकेत आहे. सध्या मार्च महिना सुरू आहे. आणखी एप्रिल मे महिना बाकी आहे. या दोन महिन्यामध्ये पारा 45 ते 46 अंशावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  त्यामुळे नागरिकांनी डोक्यावर टोपी किंवा शेलाचा वापर करावा, तसेच थंड पेय प्यावे जेणेकरून उन्हापासून आपले संरक्षण होईल. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विदर्भातील तापमानाची परिस्थिती काय?  

 विदर्भ सध्या चांगलाच तापला असून वाशिम 37.6 अंश तर अकोला 37.4 अंशांवर गेलाय. अमरावती 37.2, नागपूर 36.5 चंद्रपुर 36.4 बुलढाणा 34.6 , वर्धा 37.2, गडचिरोली 35.2 इतके तपमान आज (8 मार्च)  नोंदवल्या गेलं आहे.  मुंबई शहराता 35.3 अंश होते तर ठाण्यात 37.2अंशांवर पारा पोहोचला आहे.  येत्या पाचही दिवसात राज्यभरातील तापमान वाढणार असून 11 मार्चपर्यंत उष्णतेची लाट उत्तर व मध्य महाराष्ट्रातही धुळे, नाशिक जिल्ह्यापर्यंत राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. (IMD forecast) हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7-11 मार्चपर्यंत कोकणपट्ट्यासह मुंबई, ठाणेरायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, धूळे, व नाशिक जिल्ह्यात प्रचंड उष्णता वाढणार असून या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक आणि धुळ्यास 11 मार्चला हा अलर्ट आहे. उर्वरित राज्यातही तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सर्वोच्च तापमानाच्या नोंदी होत आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
गोंदियाच्या जिल्हा परिषदेतील लाचखोर कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात, 45 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं
गोंदियाच्या जिल्हा परिषदेतील लाचखोर कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात, 45 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं
PBKS vs DC Live Update : श्रेयस अय्यर अन् प्रियांश आर्याची फटकेबाजी; पंजाब किंग्सचे दिल्लीसमोर 211 धावांचे आव्हान
PBKS vs DC IPL 2026 Live Update : श्रेयस अय्यर अन् प्रियांश आर्याची फटकेबाजी; पंजाब किंग्सचे दिल्लीसमोर 211 धावांचे आव्हान
Tim David News : LIVE कॅमेऱ्यात कैद झाली टीम डेव्हिडची लाजिरवाणी हरकत; व्हिडीओ व्हायरल होताच BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय घडलं?
LIVE कॅमेऱ्यात कैद झाली टीम डेव्हिडची लाजिरवाणी हरकत; व्हिडीओ व्हायरल होताच BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
Embed widget