एक्स्प्लोर

Thane News: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक जाम संपणार, गाड्या सुस्साट धावणार; भुयारी मार्ग आणि एका फ्लायओव्हरला मंजुरी

Road development in Thane:घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी होणार कमी, भुयारी आणि उन्नत मार्गाच्या प्रकल्पाची करण्यात आली निविदा. या दोन्ही रस्त्यांमुळे घोडबंदर परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

ठाणे: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन मोठ्या प्रकल्पांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने निविदा देखील मागवल्या आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत भुयारी रस्ता बनवण्याचा एक प्रकल्प असून दुसरा प्रकल्प फाउंटन हॉटेल ते थेट भाईंदर पर्यंत उन्नत मार्ग बनवण्याचा आहे. 

गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) बघायला मिळते. सध्या या ठिकाणी टू बाय टू रस्ता असून त्यावरील खड्डे आणि मध्येच येणारा घाट यामुळे वाहतूक कोंडी असते. यावर उपाय म्हणून थेट भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कसा असेल भुयारी मार्ग? 

या भुयारी मार्गात दोन्ही दिशेला प्रत्येकी तीन अशा एकूण सहा मार्गिका असतील. यातील मुख्य भुयारी मार्ग हा साडेतीन किलोमीटरचा असेल. भुयारी रस्त्याची लांबी 5.5 किमी असेल. या प्रकल्पासाठी 41. 14 कोटींची निविदा काढण्यात आली आहे. दुसरीकडे फाउंटन हॉटेल ते भाईंदर हा रस्ता देखील नेहमीच वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरतो. याठिकाणी फाउंटन हॉटेलपासून भाईंदरला जाण्यासाठी एक उन्नत मार्ग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा रस्ता 9.8 किमी लांबीचा असेल तर यावर दोन्ही दिशेला चार चार मार्गिका असतील. यासाठी 28.48 कोटींची निविदा काढण्यात आली आहे. वर्सोवा ते भाईंदर हा कोस्टल रोड तसेच ठाणे शहरातील कोस्टल रोड प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर गायमुख ते भाईंदर पर्यंत वाढणारी वाहन संख्या लक्षात घेऊन हे दोन प्रकल्प मंजूर करण्यात आले असून पुढच्या चार ते पाच वर्षात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

ठाण्यात खासदार बाळ्यामामा म्हात्रेंच्या मालकीच्या ट्रकचा अपघात

ठाणे माजिवडा परिसरात ट्रक चालक व दुचाकीस्वाराचा  अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त ट्रक खासदार बाळ्यामामा यांच्या मालकीचा असल्याचे समजते. टेम्पो पंक्चर असल्याने गाडी थांबवली असता मागून येणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिली. त्याचवेळी या रस्त्यावर एका बाईकस्वाराचा अपघात झाला. 

या दोन्ही अपघातात दोन जण जखमी झाले असून धर्मेंद्र यादव आणि , सुनील बाकरे असे जखमींची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून २७ वर्षीय वैभव डावखर असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातग्रस्त वाहने पोलीस कर्मचाऱ्यांकडून टोईंग वाहनाच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

आणखी वाचा

कोट्यवधींची खैरात होऊनही चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायम; आता पादचारी मार्गासाठी 25 कोटींचा प्रस्ताव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरणPravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहितीKareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
IPO Update : सलग सहा आयपीओंमधून दमदार कमाई, स्टॅलिऑन इंडियाच्या IPO साठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP कितीवर?
आयपीओमधून कमाईचा राजमार्ग, 6 IPO मधून चांगला परतावा, स्टॅलिऑन इंडियाचा रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा पूर्ण
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
Embed widget