Maharashtra Breaking LIVE Updates: पुण्यात बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Maharashtra Breaking 9th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
Background
मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. पॅरिसमध्ये भारतीय खेळाडू जिवाची बाजी लावून पदकांसाठी प्रयत्न करत आहेत. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या घडामोडींची प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर....
मुंबईतील हिजाबबंदीच्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
मुंबईतील हिजाबबंदीच्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
मुंबईतील महाविद्यालयांनी हिजाबबंदीचा निर्णय घेतला होता
त्यात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता
सर्वोच्च न्यायालयाने मात्र हिजाबबंदीला स्थगिती दिली असून विद्यार्थिनींना परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली
पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रनची घटना, घटनेचा थरारक व्हिडीओ समोर!
पुणे
पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रन
भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास फरफटत नेले
ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली
चारचाकीचा चालक हा मद्यधुंद असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला आहे
घटनेच्या थरारक व्हिडिओ समोर
सध्या तो तरुण गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 3 दिवसाचा महाराष्ट्राचा झंझावाती दौरा
नवी दिल्ली -
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ३ दिवसाचा महाराष्ट्राचा झंझावाती दौरा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व
१६,१७ आणि १८ ऑगस्ट रोजी शाह महाराष्ट्र दौऱ्यावर
६ विभागाचा असणार दौरा
भाजप पदाधिकाऱ्यांशी विभागवार करणार चर्चा
पुण्यात बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न
पुणे : बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न...
बार्टी 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांनी 50 टक्के अधिछात्रवृत्ती देणाऱ्या निर्णयाविरोधात केला आत्मदहनाचा प्रयत्न...
बार्टी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला...
पाच ऑगस्टपासून विद्यार्थ्यांचं बार्टी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे...
सरकारचे 'लाडकी खुर्ची योजना'नेसाठी दिल्ली दरबारी लोटांगण- अमोल कोल्हे
सरकार 'लाडकी खुर्ची योजना', यासाठी दिल्ली दरबारी लोटांगण घालतायेत - अमोल कोल्हे
लाडकी खुर्ची योजना सुरू आहे, या लाडकी खुर्ची साठी वाट्टेल तितकी लोटांगणं घालण्याची तयारी या महायुतीने ठेवली आहे. यासाठी दिल्ली दरबारी दौरे सुरुयेत. त्यामुळं आता आपल्याला स्वाभिमान जागवणारे सरकार आपल्याला राज्यात आणायचं आहे. त्यासाठी ही 'शिवस्वराज्य यात्रा' आपण काढतोय, असे अमोल कोल्हे म्हणाले.