एक्स्प्लोर

सरकारची 3500 जागांसाठी जाहिरात, एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नाही; धनंजय मुंडेंचा संताप, आरोग्यमंत्र्यांना पत्र

राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 4 नोव्हेंबर 2025 रोजी समूदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) या पदाच्या सुमारे 1974 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली

मुंबई : राज्य सरकारने मेगा भरतीचं आश्वासन दिलं होतं, त्यानुसार विविध विभागातील रिक्त पदांसाठी (Job) जाहिरात प्रसिद्ध केली जात असून उमेदवारांची भरती केली जात आहे. आता, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने कंत्राटी पद्धतीने 3500 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. मात्र, या भरतीमध्ये एनटी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एनटी प्रवर्गातील विद्यार्थी, उमेदवारांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर आता राज्याचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी देखील याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash abitkar) यांना पत्र लिहून ही जाहिरात रद्द करण्याची, व नव्याने प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 4 नोव्हेंबर 2025 रोजी समूदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) या पदाच्या सुमारे 1974 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिराती मध्ये एन टी डी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र. ०१/२०२५ 4 नोव्हेंबर 2025 यान्वये एकूण 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत असून या जाहिराती मध्ये एन टी प्रवर्गातील अ, ब, क, ड या चारही प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. राज्यभरात या प्रवर्गातील लाखो विद्यार्थी असून ते या पदांसाठी प्रयत्न करत आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या एन टी प्रवर्गातील अनेक उमेदवारांनी दूरध्वनी व्दारे तसेच विविध माध्यमातून माझ्याकडे तक्रार केली असून, या दोन्ही जाहिरातीच्या माध्यमातून एन टी प्रवर्गासाठी सुमारे 3,500 जागांमध्ये एकही जागा आरक्षित नसलेबाबत संताप व दुःख व्यक्त केले आहे.

नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी

दरम्यान या दोन्ही जाहिरातीच्या माध्यमातून एन टी प्रवर्गासाठी जागा आरक्षित नसणे हे गंभीर व अन्यायकारक असून, तातडीने या जाहिरातीस स्थगिती देऊन, आरक्षित पदांची फेरतपासणी करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. तरी, आपणास विनंती की कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही यासाठी या दोन्हीही जाहिरातीस स्थगिती देऊन नव्याने जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावी, अशी विनंती आमदार धनंजय मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती शेअर केली आहे. त्यामुळे, सरकार आता धनंजय मुंडेंच्या या मागणीची दखल घेऊन एनटी प्रवर्गातील उमेदवारांचा विचार करणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

हेही वाचा

राहुल गांधींनी हाऊस नंबर झिरोच्या थिअरीचं धक्कादायक सत्य उघडं पाडलं, म्हणाले, 'मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार खोटारडे'

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, जानेवारीचे 1500 रुपये देण्यास मज्जाव, निवडणूक आयोगाचा निर्णय
मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, जानेवारीचे 1500 रुपये देण्यास मज्जाव
Embed widget