Laxman Hake : ....तर 'तो' जीआर काढण्याचे धाडसच मुख्यमंत्र्यांनी केलं नसतं; बीडच्या ओबीसी महाएल्गार सभेपूर्वी लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake: ओबीसींनी वज्रमूठ आधीच केली असती तर तो जीआर काढण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी केलंच नसतं, अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे. बीडच्या गेवराईतील उमापूर गावातून ते बोलत होते.

Laxman Hake गेवराई : खंडोबा महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. पिवळ्या समतेच्या धागेत गुंफण्याचं काम खंडोबा करतो. आम्ही आज वज्रमूठ बांधत आहोत, ओबीसींचा एल्गार होणार आहे. मात्र आज ओबीसीत (OBC) भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता एक जीआर काढला असं म्हणताय, आता कुठे ओबीसी समाज मुख्य प्रवाहात येत होता. मात्र, आजरोजी ओबीसीचे आरक्षण संपले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना एकच सांगतो गावगाड्यातील ओबीसी एक झाला आहे. त्यामुळे कमळाला (BJP) मतदान करून आम्ही चूक केली का? एकीकडे ओबीसी डीएनए म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे हा जीआर काढायचा. ओबीसींनी वज्रमूठ आधीच केली असती तर तो जीआर काढण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) केलंच नसतं, अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली आहे. बीडच्या गेवराई (Georai) तालुक्यातील उमापूर गावातून ते बोलत होते.
Laxman Hake : आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही
गेवराई मतदारसंघात एकदाच आलो आणि आमच्या उमेदवाराला 33 हजार मत मिळाली. गाव गाड्यात आमची संख्या जास्त आहे. माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके म्हणतात मी पालकमंत्री झालो असतो मात्र माझी जात आडवी आली. देवाकडे आम्हाला काही मागता आलं असतं तर आम्हीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद मागितलं असतं. तुमचा बाप उपमुख्यमंत्री झाला, त्यावेळी तुमची जात पाहिली का? गाव गाड्यातील ओबीसी संघटित नाही. बबनराव तायवडे म्हणतात ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही. मात्र सत्ताधारी हे म्हणत आहेत. मराठा समाजाला ओबीसीच्या झोपडीत गोवण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही. आमचं आज आरक्षण गेले आहे. जरांगे नावाचा माणूस उठतो आणि आम्ही गरीब झालो असं म्हणतो. या माणसाने तुमचं आमचं आरक्षण आज संपवले आहे. खंडोबाच्या साक्षीने आता ओबीसीने एकत्र यायच आहे. असे आवाहन देखील लक्ष्मण हाके यांनी यावेळी केल.
Laxman Hake on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना घेरण्याचं काम सध्या सुरू
ओबीसी बांधव 60 टक्के आहेत, जरांगेला पाठिंबा देणाऱ्या माणसाला तुम्ही आम्ही मत द्यायची का? बजरंग सोनवणे यांनी बेकायदा मागणी करणाऱ्या जरांगे पाटलाला पाठिंबा दिला. गाव गाड्यातील ओबीसी संघटित नाही. त्यांना आमच आरक्षण गेलं त्यावेळी तुम्ही काय करत होता? हा जाब विचारायचाय. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व. असे असताना मंत्री छगन भुजबळ यांना घेरण्याचं काम सध्या सुरू आहे, असेही लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























