एक्स्प्लोर

Walmik Karad : वाल्मिक कराडचे लातुरातही घबाड, दुसऱ्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन 

Walmik Karad Property : लातूर टेंभुर्णी महामार्गावर मुरूडच्या जवळ वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे कोट्यवधींची जमीन असल्याची माहिती समोर आली आहे. 

लातूर : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावावर लातूरमध्येही चार ते पावणे पाच एकर शेती असल्याची माहिती आहे. या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये आहे. संरपंच हत्या प्रकरणात एसआयटीकडून याची माहिती घेणं आता सुरू आहे.  

राज्यातील अनेक ठिकाणी संपत्ती असलेल्या वाल्मिक कराडची लातूर जिल्ह्यात देखील संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. लातूर टेंभुर्णी महामार्गावर मुरुडच्या जवळ कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे चार ते पावणे पाच एकर जमीन आहे. 

गुन्हेगारी मार्गाने कमावलेला पैसा 

परळी आणि बीडममध्ये गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून  वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने राज्यातील वेगवगेळ्या शहरांत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आलं आहे. त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि टोळीने पंचवीस कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतले आहेत. 

पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती

वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजीरीच्या नावे सव्वाचार कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर दुसरी पत्नी ज्योतीच्या नावे साडेसतरा कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे. अशाप्रकारे दोन्ही पत्नींच्या नावे मिळून एकूण 19 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत आढळून आली आहे.

पहिली पत्नी मंजिलीच्या नावे असलेली संपत्ती 

- पहिली पत्नी मंजीली आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी - चिंचवडच्या काळेवाडीत 4 BHK फ्लॅट - अंदाजे किंमत - सव्वा तीन कोटी.
- पहिली पत्नी मंजीली आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी - चिंचवडच्या वाकडमधे टू बीएचके फ्लॅट - अंदाजे किंमत एक कोटी.

वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे असलेली संपत्ती

- फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत दोन ऑफिस स्पेसेस - अंदाजे किंमत - अंदाजे बारा कोटी.
- पुण्यातील हडपसरमधील अॅमनोरा टाऊनशीपमधे एक फ्लॅट - किंमत अंदाजे दीड कोटी रुपये.
- खराडी मधील गेरा ग्रीन्सव्हीला सोसायटीत एक फ्लॅट - किंमत अंदाजे - पावशे दोन कोटी रुपये.
- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेंद्रे गावात 35 एकर जमीन. किंमत अंदाजे दीड कोटी रुपये.
- दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा इथे 9 एकर जमीन. किंमत अंदाजे सत्त्यात्तर लाख रुपये. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Embed widget