Riteish Deshmukh : रितेश देशमुख वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला, हुंदके अन् अश्रू अनावर
Ritesh Deshmukh Emotional Speech : रितेश देशमुख वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला. (Ritesh Deshmukh Got Emotional Speech on Father Vilasrao Deshmukh)
Ritesh Deshmukh Speech on Father Vilasrao Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या आठवणीत रितेश देशमुखला रडू कोसळलं आणि रितेश उपस्थितांसमोर मंचावरच हुंदके देत रडू लागला. आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली, हे सांगताना रितेशला भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला. यावेळी भाऊ अमित देशमुखने रितेशला सावक भाषण पुढे सुरु ठेवण्यास सांगितलं.
वडिलांची उणीव भासते : रितेश देशमुख
रितेश देशमुख वडिलांची आठवण काढत म्हणाला की, सध्याचं राजकारण फार वेगळं आहे, साहेबांच्या काळात राजकारण होतं, पण वैयक्तिक टीका घेतली. वडील विलासरावांच्या आठवणीत रितेश म्हणाला की वडिलांची उणीव नेहमीच भासते, पण वडिलांची उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या मागे उभे राहिले. काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो, असं म्हणत रितेश देशमुखने काका दिलीपरावांबद्दलचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं.
'आजोबा आणि वडिलांचे संस्कार पुढे चालवत आहोत'
विलासराव देशमुखांचा पुतळा अनावरणावेळी रितेश देशमुखने म्हटलं की, 'या परिसरात असलेला हा पुतळा पाहून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. एक व्यक्ती आणि एक माणूस म्हणून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली गेली पाहिजे. आपण जन्मापासून विविध भूमिका साकारत असतो. यात माणुसकी जपणारी लोकं हेच खरं भांडवल आहे. माझ्या आजोबांना त्याचा मुलगा मंत्री झाल्यावर कौतुक होते. मात्र, आजोबांना काही खटकलं की ते बोलत असत. विलासराव देशमुख यांना त्याच्या वडिलांनी एका पेपरची कटिंग दाखवत वैयक्तिक टीका करू नका, अशी शिकवण दिली. हे तेच संस्कार आहेत, याचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत.'
'राजकारणात टीकास्त्र सुरू आहे, ते योग्य नाही'
'आम्ही वैयक्तिक टीका करत नाही. आज राज्याच्या राजकारणात जे टीकास्त्र सुरू आहे ते योग्य नाही. विलासराव देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर ते कारखाना वर आले. आजोबांच्या पाय पडले. त्यावेळी साहेब भावनिक झाले होते', ही आठवणही त्यांनी बोलून दाखवली.
Ritesh Deshmukh Emotional Speech : साहेबांना जाऊन 12 वर्ष झाली... हुंदका आवरत आठवणींना उजाळा
महत्त्वाच्या इतर बातम्या :