एक्स्प्लोर

Makar Sankranti: स्मशानभूमीत हळदी कुंकू! लातूरमधील गावातील मकरसंक्रांतीच्या अनोख्या कार्यक्रमाची चर्चा

लातूर जिल्ह्यातील माकणी थोर या गावातील महिलांनी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा जंगी कार्यक्रम स्मशानभूमीत घेतला आहे. या अनोख्या कार्यक्रमाची जिल्हाभर चर्चा आहे. 

Latur Makar Sankranti 2023: स्मशानभूमी म्हटलं अनेकांच्या अंगावर काटा येतो. गावखेड्यात आजही कोणत्याही शुभ कार्याला बाहेर जाताना लोक स्मशाना समोरूनही जाण्याचं टाळत असतात.  मात्र लातूर जिल्ह्यातील माकणी थोर या गावातील महिलांनी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा जंगी कार्यक्रम स्मशानभूमीत घेतला आहे. या अनोख्या कार्यक्रमाची जिल्हाभर चर्चा आहे. 

मकर संक्रांतीनिमित्त पुढील अनेक दिवस महिलांवर्ग हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करत असतात. आज त्याची सुरुवात झाली आहे. माकमी थोर गावातील सर्व महिला एकत्रित येत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत आहेत. तोही चक्क समशानभूमीत. या गावातली समशानभूमी ही आधी काट्याकुट्यांनी भरलेली अस्वच्छ होती . मात्र गावातील तरुणांनी श्रमदान मोहीम आखली.

काही दिवसातच स्मशानभूमी ही स्वच्छ आणि सुंदर झाली. या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.  स्मशा भूमीच्या प्रवेशद्वारापासून आतपर्यंत पेवर ब्लॉकचं काम करण्यात आलं. स्मशानभूमीमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण झालं. गावातील तरुण काहीतरी धडपड करतायेत आणि नाविन्यपूर्ण बाबी करतायेत हे लक्षात आल्यामुळे गावातील महिलांनीही पुढाकार घेतला.

महिलांनी चक्क स्मशानभूमीत मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. गावातील तब्बल 200 महिलांनी या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत स्मशानभूमीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. 

बीडमधील महिलाच्या उपक्रमाचीही झाली होती चर्चा

समाजातील काही प्रथांमुळं विशिष्ट वर्गाला मात्र सणाचा भाग होता येत नाही.  मकरसंक्रांत (Makar Sankrant) म्हटलं सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण. आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रांत साजरी करतात.  याच मकरसंक्रांतीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये 'मकर संक्रात कुंकवा पलीकडची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बीडच्या काकडहिरा गावात विधवा महिलांच्या सन्मानासाठी मकरसंक्रातीचा सोहळा रंगला. प्रतिभा हावळे आणि मनीषा जायभाये या दोघी मैत्रिणी गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या गावात संक्रांतीच्या सणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करतात.. विधवा झाल्यानंतर आपल्याला जी वागणूक मिळाली ती इतर महिलांना मिळू नये म्हणून या दोघींनी या उपक्रमाची सुरुवात केली. कुणाला अपघाताने तर कुणाला नशिबाने अकाली विधवापण येते म्हणून त्यांना कायम दुय्यम वागणूक दिली जाते. म्हणूनच कुकंवा पलीकडची ही संक्रांत आपल्या समाजा समोरचा मोठा आदर्श म्हटला पाहिजे. 

ही बातमी देखील वाचा

PHOTO: मकरसंक्रांतीला सौभाग्याचं लेणं विधवांच्याही पदरी; बीडमधील अनोख्या उपक्रमाचं होतंय कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 730AM 28 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाTop 70 at 07AM Superfast 28 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 28 January 2025Chhaava Movie controversy Special Report 'छावा'वरून वाद 'लेझीम'ला कट,आक्षेपार्ह सीन वगळण्याचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Embed widget