एक्स्प्लोर

Latur News: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Latur News: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे.

Latur News: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये समोर आल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय 81 वर्षे) (Chandrasekhar Patil Chakurkar) असे आत्महत्या करणाऱ्या चाकूरकरांच्या भावाचे नाव आहे. चंद्रशेखर चाकूरकर हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. तर चंद्रशेखर चाकूरकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना 'गूड बाय' असा टेक्स मॅसेज केला होता. 

चंद्रशेखर चाकूरकर हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत. दररोज सकाळी ते फिरायला घराबाहेर पडायचे. त्यानंतर ते स्वताच्या घरी जाण्याऐवजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी जत होते. तिथे चहा पाणी झाल्यावर तेथील पेपर वाचत बसणे ही त्याची खूप वर्षापासूनची सवय आहे. त्यानंतरच ते बाजूलाच असलेल्या स्वतःच्या घरी जात होते. तर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील अधिकतर व्यक्ती हे लातूर येथील निवासस्थानी कधीतरीच हजर असतात. आज शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते.  

दरम्यान सकाळी फिरून आल्यावर नित्याप्रमाने चंद्रशेखर चाकूरकर हे शिवराज चाकूरकर यांच्या घरी आले. घरात आल्यावर शैलेश पाटील यांनी त्यांना चहा घ्या मी आवरून येतो, असे सांगून निघून गेले.  मात्र काहीवेळाने गोळीचा आवाज झाला. त्यामुळे घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉलमध्ये आले. यावेळी त्यांना तिथे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. तर घटनेची माहिती तात्काळ लातूर पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामाची प्रक्रिया सुरू केली आहे. 

अनेकांना केला 'गूड बाय'चा मॅसेज 

दरम्यान चंद्रशेखर चाकूरकर यांनी आधीच आत्महत्या करण्याचा निश्चीय केला असल्याचं समोर आले आहे. कारण आज सकाळी जेव्हा ते नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले, त्यानतंर त्यांनी स्वताच्या मोबाईल मधील परिचित असलेल्या अनेकांना 'गूड बाय' असा टेक्स मॅसेज केला होता. तर काही वेळाने व्हॉट्सअँपवर देखील त्यांनी 'गूड बाय' स्टेटस ठेवला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

सततच्या आजारपणाला कंटाळून गेले होते.

चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती पाहत होते. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. सर्वच मुलांची लग्न झाले आहेत. तर ते सध्या एका मुलाबरोबर शिवराज चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. वयोमानाप्रमाणे त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या. त्यामुळे ते सततच्या आजारपणाला कंटाळून गेले होते. तर घरात सून मुलगा आणि नातवंडे असल्यामुळे त्यांनी एकांत जागा म्हणून चाकूरकर यांच्या घरातील हॉलमध्ये आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर चंद्रशेखर पाटील चाकूरकर याचे चिरंजीव ॲड. लिंगराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर चाकूरकर यांची बायपास झालेली होती. अशातच अनेक व्याधी जडल्या होत्या. सततच्या आजारपणाला ते कंटाळून गेले होते. त्यातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Latur: पोलिस ठाण्यात रील अन् भावानं केली हवा... नंतर पोलिसांनी काढली त्याचीच 'हवा'; लोक म्हणाले, फरक दिखता है!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget