एक्स्प्लोर

Urea Stock Seized : भिवंडीत 18 लाख रुपयांचा 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त, तपासणीनंतर कारवाई होणार 

Urea stock seized : भिवंडीत (Bhiwandi) पोलिसांनी सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त (urea stock seized) केला आहे.

Urea Stock Seized : भिवंडीत (Bhiwandi) पोलिसांनी सुमारे 100 टन संशयित युरियाचा साठा जप्त (Urea Stock Seized) केला आहे. नारपोली पोलिसांनी (Narpoli Police) ही कारवाई केली आहे. मागील तीन महिन्यांपूर्वीच नारपोली पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. यामध्ये 18 लाख रुपये किंमतीचा निमकोटेड युरियाचा साठा जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा भिवंडीतील गोदाम पट्ट्यात युरियाचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

एकूण 18 लाख 87 हजार 650 रुपयांचा संशयित युरियाचा साठा जप्त

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील ज्योती कम्पाऊंड येथील गजानन ट्रान्सपोर्टच्या गोदामात संशयित युरियाचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ठाणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह नारपोली पोलिसांनी संबंधित गोदमावर कारवाई केली. यावेळी तेथील गोदामात 14 लाख 12 हजार 650 रुपये किंमतीचा खतांचा साठा आढळून आला. तसेच तिथे उभ्या असणाऱ्या ट्रकमध्ये (MH FV 5460) 4 लाख 75 हजारांचा 99 हजार 350 किलो वजनाचा खताचा साठा जप्त करण्यात आला. एकूण 18 लाख 87 हजार 650 रुपयांचा संशयित युरियाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

निमकोटेड युरिया आढळल्यास गुन्हा दाखल होणार 

दरम्यान, संशयित युरिया औद्योगिक वापराचा आहे की कृषी उपयोगाचा आहे याची तपासणी करण्यासाठी ठाणे कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण पथक गोदामातील युरियाचे नमुने घेतले आहेl. हे खतांचे नमुने नाशिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. संबंधित संशयित साठा हा कृषी वापरातील निमकोटेड युरिया आढळल्यास तसा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

खतांच्या किंमती तसातत्याने वाढ

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खताच्या किंमतीत देखील सातत्याने वाढ होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खतांच्या किमंती वाढल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणाम उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच बोगस खतांच्या निर्मितीच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. याचा देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भारतात शेतीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर युरियाचा वापर केला जातो. खतांच्या अति वापराचे काही वेळाला दुष्परिणामही होतात. त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.   

महत्त्वाची बातमी

Chemical Fertilizer Price Hike : शेतकऱ्याची चिंता वाढली; रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha 2024 : महायुतीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज, महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शनVare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 25 April 2024Sangli : Chandrahar Patil यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट, Nana Patole यांच्याकडून स्वागतWari Loksabhechi Dharashiv EP 11 : ओमराजे की अर्चना पाटील? धाराशिवकर कुणाच्या मागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Vidya Balan : मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Mrunal Thakur On Freezing Eggs :  मृणाल ठाकूरने प्रेग्नेंसीबाबत घेतला मोठा निर्णय,  म्हणाली, योग्य जोडीदार मिळणं कठीण...
मृणाल ठाकूरने प्रेग्नेंसीबाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाली, योग्य जोडीदार मिळणं कठीण...
Embed widget