Latur Water Problem Solved : पावसाची उत्तम साथ, लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न निकाली
Latur Watar Problem Solved : लातूर जिल्ह्यात मागील सहा वर्षापासून पाणी टंचाई नाही. मांजरा धरणात यावर्षीच्या पावसाळ्यात 24.243 दलघमीचा पाणीसाठा जमा झाला. इतर प्रकल्प भरत आले आहेत.
Latur Watar Problem Sloved : 2016 मध्ये लातूर (Latur) जिल्ह्यावर जल संकट (Water Crisis) आले होते. धरणात पाणी नव्हते. भूजल पातळी खोलवर गेली होती. अशा कठीण कालावधीचा सामना केल्यानंतर आजतागायत तशी परस्थिती लातूर जिल्ह्यावर आली नाही. मागील सहा वर्षांपासून पावसाने उत्तम साथ दिली आहे.
मांजरा धरणात (Manjara Dam) यंदाच्या पावसाळ्यातही 24.243 दलघमी पाण्याचा संचय झाला असल्याने लातूरच्या पिण्याच्या पाण्याची चिंता कधीच मिटली आहे. आजमितीला मांजरा प्रकल्पात 40.42 टक्के जिवंत पाण्याचा संचय झाला आहे. प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत 374 मिमी पाऊस झाला आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा जुलै महिन्यापासून धरणामध्ये पाण्याची वाढ झाली आहे. या पावसाळ्यातील अडीच महिन्यांत 24.243 दलघमी नवीन पाणी आले आहे. दररोज पावसाची ये-जा सुरु आहे. गेल्या 24 तासांमध्ये प्रकल्पात 0.283 दलघमी पाणी आले आहे. थेंबे थेंबे प्रकल्पात पाणी साचत आहे.
सहा वर्षांपासून पाणीटंचाई नाही
मांजरासह इतर प्रकल्पही भरले आहेत. गेल्या सहा वर्षापासून लातूर शहरात वा जिल्ह्यात टंचाई नाही. गेली सहा वर्षे चांगला पाऊस पडत असल्याने टंचाई नाही. जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तावरजा नदीवरील बॅरेजेसही दरवर्षी भरलेले आहेत. यंदाही जुलै महिन्यातच अनेक बॅरेजेसमधून पाणी सोडून द्यावे लागले आहे.
मध्यम प्रकल्पांतीलही पाणी साठा वाढला
जिल्ह्यातील तावरजा, रेणा, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, धरणी, मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प जिल्ह्यात आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये चांगला संचय झालेला आहे. तावरजा वगळता रेणा, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी आणि मसलगा प्रकल्प 60 टक्क्यांच्या वर भरले आहे. यामुळे यंदाही पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
मांजरा प्रकल्पाच्या खाली मांजरा नदीवर 15 बॅरेजेस आहेत. या बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध झालेले आहे. नियमानुसार या बॅरेजेसमधून विसर्ग केला आहे. लासरा, बोरगाव-अंजनपूर, वांजरखेडा, टाकळगाव देवळा, वांगदरी, कारसा पोहरेगाव, साई, नागझरी, शिवणी, खुलगापूर, बिंदगीहाळ, डोंगरगाव, धनेगाव, होसूर या बॅरेजेसचा समावेश आहे.