Latur News: शेतकऱ्यांच्या घामाला मिळेना दाम; लातूरच्या बाजारात भाजीपाल्याला भाव नाही, शेतकरी सापडला संकटात
Latur News: कांद्याला किलोला तीन रुपये मिळत नाहीत..मेथीला तर भावच नाही .. कोणतेही भाजी किलो दहा रुपयापेक्षा दराने विकली जात आहे.
![Latur News: शेतकऱ्यांच्या घामाला मिळेना दाम; लातूरच्या बाजारात भाजीपाल्याला भाव नाही, शेतकरी सापडला संकटात Latur News Farmers no price for vegetables in Latur market farmers are in trouble Latur News: शेतकऱ्यांच्या घामाला मिळेना दाम; लातूरच्या बाजारात भाजीपाल्याला भाव नाही, शेतकरी सापडला संकटात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/70ef4a7d1241f45a15bb0ddc8427b6fa168473119536189_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : अगोदर अवकाळीने कंबरडे मोडले असताना आता भाजीपाल्याचे दर (Vegetable Prices) अचानक कोसळले आहेत, याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना (Farmers) बसताना दिसून येत आहे. उत्पादक शेतकऱ्यांना पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकावा लागत आहे. टोमॅटो एक रुपये किलो तर कांद्याला तीन रूपये किलो पालेभाज्या 4 ते 5 रुपये जुडी या दराने विकल्या जात आहेत. सर्वच भाज्या दहा रुपये किलोच्या घरात विकल्या जात असल्यामुळे भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.
सर्वत्र दर वाढत आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले मात्र भाज्यांच्या घसरलेल्या दरांनी शेतकऱ्याचे अर्थकारण पार कोलमडून गेले आहे. टोमॅटोचे पीक अक्षरश: नष्ट करण्याची किंवा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. कांद्याला किलोला तीन रुपये मिळत नाहीत..मेथीला तर भावच नाही .. कोणतेही भाजी किलो दहा रुपयापेक्षा दराने विकली जात आहे.
वाढलेला वाहतूक खर्च आणि मिळणारा बाजारभाव यांच्या चक्रात शेतकरी पार गुरफटून गेला आहे. कमी दर मिळत असल्याने उत्पादन आणि दळणवळण खर्चही निघत नाही. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली आहे. काही महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव पडलेले होते. ते स्थिर होण्यासाठी बराच वेळ लागला होता. मात्र आता रोज कांद्याचे भाव पडत आहेत. काही दिवसापूर्वी 60 किलोच्या कट्ट्याला चारशे रुपये भाव होता तो आता 150 रुपयावर आला आहे. त्यात आवक ही रोज वाढत चालली आहे. लग्न सराईमध्ये कांद्याला भाव येईल ही आशा ही आता धुळीला मिळाली आहे. पातीचा कांदा ही मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे भावात सतत घसरण होत चालली आहे.
लातूरच्या बाजारात येणार माल पुढे पाठवला जातो मात्र तेथे ही मागणी नसल्यामुळे भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान केले आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे भाज्या लवकर खराब होत आहेत. याचा एकत्रित परिणाम हा भावावर झाला आहे. कमी दर मिळत असल्याने उत्पादन आणि दळणवळण खर्चही निघत नाही. हीच अवस्था इतर भाजीपाला पिकाची ही होत आहे. टोमॅटो भाव नसल्यामुळे शेतकरी रस्त्यावर फेकून जात आहे. तर मेथी, पालक, वांगे गवार, दोडके यांच्याबरोबर इतर भाजीपाल्याची आवक वाढली असल्यामुळे भाव मिळत नाही. लातूरच्या भाजी मंडईत एका ही भाजीला 10 रुपयांच्या पुढे भाव मिळत नाही.
एकीकडे धान्याला हमीभाव दिला असताना त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही तर दुसरीकडे भाजीपाल्याचे दरही कवडीमोल होत आहेत. शेतकऱ्यानी केलेली मेहनत आणि खर्च निघणे दुरापास्त झाले आहे. त्यातच वाहतुकीच्या वाढलेल्या खर्चाने भर घातली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)