धीरज देशमुखांना चितपट करत कुस्तीचा फड जिंकणार; भाजप आमदार रमेश कराडांनी दंड थोपटले
Latur Assembly Election : रेणापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या कार्यक्रमात कराड यांनी आमदार धीरज देशमुख यांना थेट आव्हान दिले आहेत.
Latur Assembly Election : मागच्या दाराने विधानपरिषदेत न जाता आता थेट निवडणूक लढवणार असल्याचा दावा करत भाजप आमदार रमेश कराड (Ramesh Karad) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकेल आहेत. तर, 2019 मध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघात (Latur Rural Constituency) पैशाच्या जोरावर धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) निवडून आले होते. मात्र यावेळी कुस्ती होणार आणि विरोधकांना चितपट करत कुस्तीचा फड आम्हीच जिंकणार असल्याचं देखील आमदार रमेश कराड म्हणाले आहेत. रेणापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्तीच्या कार्यक्रमात कराड यांनी आमदार धीरज देशमुख यांना थेट आव्हान दिले आहेत.
भाजपा आमदार रमेश कराड यांनी काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 2019 मध्ये लातूर ग्रामीण मतदार संघात पैशाच्या जोरावर धीरज देशमुख निवडून आले होते. देशात एक नंबरचे मतदान हे या मतदारसंघात संघात नोटा या चिन्हावर झाले होते. त्यांनी आजही सांगाव की, त्यांनी कोणाच्या विरोधात निवडणूक लढवली. जी माणसं एसीत बसून बंद दारामध्ये राजकारण करतात त्याला सर्वसामान्य जनता आता वैतागली आहे. त्यामुळे आता मागच्या दाराने विधानपरिषदेत न जाता आता कुस्तीच्या फंडांमध्ये जाऊन कुस्ती खेळायची आणि ती कुस्ती जिंकून आपल्याला सभागृहात जायचं असा निर्धार आमदार रमेश कराड यांनी केला आहे.
ऐनवेळी जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने संधी हुकली...
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून रमेश कराड यांना दोन वेळा संधी देण्यात आली होती. दोन्ही वेळेस रमेश कराड यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये तिसऱ्या वेळेस संधी घेऊन रमेश कराड यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून यायचं होतं. मात्र, ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. पंधरा वर्षापासून तयारी करणार रमेश कराड यांना तो मोठा झटका होता. धीरज देशमुख यांची पॉलिटिकल लॉन्चिंग यामुळे अतिशय सोपी झाली होती. धीरज देशमुख नकोत आणि नोटाला मतदान करा असा प्रचार यावेळी करण्यात आला. यात शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा नोटला अधिक मतदान झाले होते.
धीरज देशमुख यांना खुले आव्हान...
तीन वेळेस जोरदार तयारी करणाऱ्या रमेश कराड यांच्या पदरी निराशाच आली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षांने त्यांना विधान परिषदेतून आमदार केलं. मात्र, आता कुस्तीचा फड रंगणारच आणि विरोधकांना चितपट करत कुस्तीचा फड आम्हीच जिंकणार असा निश्चिय कराड यांनी केला आहे. तसेच, कार्यकर्त्यांची अशी इच्छा असून, आमची ही तयारी असल्याचे म्हणत कराड यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धीरज देशमुख यांना एकप्रकारे खुले आव्हानच दिल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :