10 th Exam Result : एकाच बोर्डात दहावीच्या 123 विद्यार्थ्यांना तब्बल 100 टक्के गुण, लातूर पॅटर्नचा डंका कायम, 9 हजार पोरांना 90 टक्के!
Latur Pattern 10 th Exam Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. दरम्यान, यंदा एकाच जिल्ह्यात 123 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.
Latur Pattern 10 th Exam Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. दरम्यान, यंदा एकाच जिल्ह्यात 123 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. राज्यात 100 टक्के गुण घेणारे विद्यार्थी 187 आहेत. त्यापैकी 123 विद्यार्थी हे लातूर विभागातील आहेत. राज्यात सर्वात जास्त पैकीच्या पैकी गुण घेण्याचा हा लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो. याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदाही लातूर पॅटर्नचा डंका कायम आहे.
लातूर विभागात 9 हजार 831 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेतले आहेत. एकूण निकालाच्या 9.762 टक्के हे प्रमाण आहे. 85 ते 90 टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी संख्या एकूण निकालाच्या 11 टक्के असून, विद्यार्थी संख्या 11 हजार 77 एवढी आहे. 80 ते 85 टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12 हजार 464 असून, त्याची टक्केवारी 12.38 एवढी आहे. 75 ते 80 टक्के गुण घेणारे 12 हजार 276 विद्यार्थी आहेत. एकूण निकालाच्या 12.19 टक्के हे प्रमाण आहे. 70 ते 75 टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 11 हजार 443 असून, एकूण निकालाच्या 11.36 टक्के हे प्रमाण आहे. 65 ते 70 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रमाण 10.32 टक्के असून, विद्यार्थी संख्या 10 हजार 395 एवढी आहे. 60 ते 65 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 10 हजार 205 एवढी असून, एकूण निकालाच्या 10.13 टक्के हे प्रमाण आहे. 45 ते 60 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 17 हजार 658 असून, एकूण निकालाच्या 17.53 टक्के हे प्रमाण आहे. लातूर विभागात 46 टक्के पेक्षा कमी गुण घेणारे 5 हजार 354 विद्यार्थी असून, एकूण निकालाच्या 5.317 टक्के हे प्रमाण आहे.
100% गुणाची परंपरा कायम
लातूर बोर्डाच्या निकालात शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही नेत्रदीपक आहे. लातूर बोर्डात लातूर धाराशिव आणि नांदेड या तीन जिल्ह्याचा समावेश होतो. लातूर बोर्डात 123 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेतले आहेत. लातूर येथील केशवराज विद्यालयातील 12 विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर टक्के तर श्री देशी केंद्र विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण अर्जित केले आहेत. मागील अनेक वर्षापासून या दोन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
अनेक वर्षापासून विद्यालयाचा निकाल सर्वोत्कृष्ट
श्री देशी केंद्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री ठवळे यांनी सांगितले की, आम्ही विद्यार्थ्यांचे दोन गट बनवतो. जे विद्यार्थी कच्चे आहेत त्यांना स्कोरिंग करण्यासाठी मदत करणे आणि विद्यार्थ्यांना आणखीन मार्क स्कोर करण्यासाठी प्रोत्साहित करणे. घटक चाचणी होमवर्क शाळेमधले अतिरिक्त वर्ग या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव करून घेण्याचा प्रयत्न करतो. यातूनच सातत्याने मागील अनेक वर्षापासून विद्यालयाचा निकाल हा सर्वोत्कृष्ट राहिला आहे. शंभर टक्के गुण घेतलेली संजना कल्याणी तिने सांगितले की, अभ्यास खूप सोपा होता. शिक्षकांनी वर्गामध्ये सातत्याने जे सांगितलं त्याच्यावर लक्ष ठेवणे दररोज न चुकता अभ्यास केला, शिक्षकांच्या सूचनांचे पालन केले, यामुळेच 100% गुण मिळू शकले.
इतर महत्वाच्या बातम्या