एक्स्प्लोर

Latur: इंस्टाग्रामवर शिवी दिली म्हणून अपहरण करुन खुनाचा प्रयत्न, नग्न करून बेल्टने केली जबर मारहाण

इन्स्टाग्रामवर शिवी दिली म्हणून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

लातूर: इंस्टाग्राम वरून शिवी दिल्याच्या किरकोळ कारणावरून बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचं सिनेस्टाईल अपहरण करण्यात आलं आणि चक्क नग्न करून अमानुषपणे मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. लातुरातल्या ट्युशन एरियात सक्रिय असलेल्या एका क्राईम कंपनीकडून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला. एकूण अकरा जणांनी मिळून हा प्रकार केल्याचं समोर आलं असून त्याचा धक्कादायक आणि अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला.

शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळं नावारूपाला आलेल्या लातूर शहरातल्या ट्युशन एरियात गुन्हेगारांनी दहशत पसरवायला सुरुवात केली आहे. परजिल्ह्यातून आणि परराज्यातून विध्यार्थी शिक्षणासाठी लातुरात येतात. त्यामुळं त्यांच्यात दहशत निर्माण करून पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. अशाच एका मुलांच्या गटाने इन्स्टाग्रामवर शिवी दिल्याचे कारण पुढे करत अल्पवयीन विद्यार्थ्यांस बेदम मारहाण केली आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळं घातपाताचा आरोपींचा कट उधळला असला तरी या आरोपींनी क्रौर्याची सीमा गाठलीय. यातील दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत तर इतर आरोपी त्यांचे हस्तक म्हणून काम करतात. या प्रकरणी पाच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय तर इतर सहा आरोपी अद्यापही फरार आहेत.

जिल्ह्यातला क्राईम रेट कमी करण्यासाठी लातूरचे पोलीस अधीक्षक सक्रिय असतात. त्यामुळं ट्युशन एरियात थेट पोलीस चौकीची देखील स्थापना करण्यात आली. मात्र या पोलीस चौकीत नेहमी शुकशुकाटच असतो. आता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक गुन्हेगारांवर जरब बसवतील का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
Al Aqsa Mosque : अल अक्सा मशिद खुली करा, नमाद अदा करू द्या, अन्यथा... इस्त्रायलविरोधात आठ मुस्लिम देश एकवटले
अल अक्सा मशिद खुली करा, नमाद अदा करू द्या, अन्यथा... इस्त्रायलविरोधात आठ मुस्लिम देश एकवटले
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
Iran US War : इराण-अमेरिका युद्धात चिमुकल्यांचा बळी, पश्चिम आशियात 1100 हून अधिक बालकांचा मृत्यू
इराण-अमेरिका युद्धात चिमुकल्यांचा बळी, पश्चिम आशियात 1100 हून अधिक बालकांचा मृत्यू

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget