एक्स्प्लोर
Ambabai Mandir Navratri : द्वितीय माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची दुर्गा देवीच्या सिंहावर बसलेल्या रुपात पूजा
अंबाबाईची नवरात्रोत्सवाच्या द्वितीय माळेला सिंहावर विराजमान दुर्गादेवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, सचिन घोटखिंडीकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
Ambabai Mandir Navratri : श्री करवीर निवासिनी अंबाबाईची नवरात्रोत्सवाच्या द्वितीय माळेला सिंहावर विराजमान दुर्गादेवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. सिंहावर बसलेली, अष्टभुजा, तीन नेत्र असलेल्या दुर्गादेवीच्या शिरावर चंद्रमाचा मुकुट आहे, असे वर्णन आहे. ही पूजा श्रीपूजक अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, सचिन घोटखिंडीकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
नवरात्रोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची दुर्गा देवीच्या सिंहावर रु रुपात पूजा बांधण्यात आली आहे. दुर्गा सप्तशतीचा बारावा अध्यायामध्ये श्री दुर्गा देवीचे ध्यान आहे. सिंहावर बसलेली अष्टभुजा, तीन नेत्र असलेल्या दुर्गादेवीच्या शिरावर चंद्रमाचा मुकुट आहे. दुःख,दारिद्र्य भय दूर करणारी दुर्गम संकटातून पार करणारी, दुर्गम पिढेचा नाश करणारी अशी दुर्गा देवीची स्तुती केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement