एक्स्प्लोर

Kolhapur News : राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर चार दिवसातच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापुरात

बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानावर होत असलेला मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. 

कोल्हापूर : कोल्हापुरातील कसबा बावड्यातील शिवरायांचा पुतळा अनावरण आणि संविधान संमेलन दौरा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी अत्यंत दिमाखदारपणे करून  दाखवल्यानंतर आता महायुतीकडून सुद्धा येत्या बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जंगी तयारी करण्यात येणार आहे. बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानावर होत असलेला मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. 

दौरा नियोजनासाठी पार पडली बैठक 

दरम्यान, कोल्हापुरातील शेंडापार्कमधील 1100 खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन, जिल्हा बँक विस्तारित इमारतीचे उद्घाटन व मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवारी कोल्हापुरात बैठक घेण्यात आली. मुश्रीफ यांनी सांगितले की, कोल्हापुरातील सामान्य माणसाला उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज भासू नये, यासाठी प्रशस्त रुग्णालय मंजूर केलं आहे. विविध वैद्यकीय महाविद्यालये सुरू करत आहोत, इतकी चांगली आरोग्य सेवा पश्चिम महाराष्ट्रात कोठेही नाही. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. 

विकासकामे सांगताना दम लागतो

गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी कोल्हापुरात आला आहे. ही कामे सांगताना दम लागतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत हीच कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरमध्ये परतणार, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंद्राच्या पाहणीसाठी दाखल
'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरमध्ये परतणार, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंद्राच्या पाहणीसाठी दाखल
Manoj Jarnage: तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय
Manoj Jarnage: तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय
Chandrakant Patil: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे', शरद पवारांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर, म्हणाले....
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंच्या खूपच पुढे', शरद पवारांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं प्रत्युत्तर, म्हणाले....
संतापजनक! 7 हजारांच्या रकमेवर दीड लाखांचं व्याज, सावकारीच्या व्याजासाठी महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास पाडलं भाग 
संतापजनक! 7 हजारांच्या रकमेवर दीड लाखांचं व्याज, सावकारीच्या व्याजासाठी महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास पाडलं भाग 

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget