एक्स्प्लोर

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील पालकमंत्रिपदासाठी कोल्हापूरला पसंती देणार की पुणेकर होणार?

कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार? याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकमंत्रिपद सतेज पाटील यांच्याकडे होते. गेल्या अडीच वर्षापासून त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती.

Chandrakant Patil : विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. 

विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवघे 30 तास दिल्यानंतर शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. मात्र, घनघोर सुनावणीनंतर ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी आदेश देण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच आपली तलवार म्यान केली आणि राजीनामा दिला.

दरम्यान, शिंदे गटाच्या समर्थनाच्या जोरावर राज्यात भाजप सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस असतील यात शंका नाही. मात्र आता संभाव्य मंत्रिमंडळ कसं असेल? राज्यातील प्रदेशनिहाय त्याचे मंत्रिमंडळ वाटप कसं असेल? शिवसेना बंडखोर मंत्र्यांना मंत्रिपद पुन्हा मिळणार का? तसेच भाजपमधील नवीन चेहरे कोण असतील याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्रिपद कोणाला?

कोल्हापूर जिल्ह्यातही  बंडखोरीचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर तसेच शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देत गुवाहाटीमध्ये दाखल झाले. यामुळे मंत्रिपदासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर आणि  प्रकाश आबिटकर रेसमध्ये असतील. त्याचबरोबर भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनाही संधी मिळते का? याचीही उत्सुकता आहे. 

चंद्रकांत पाटील कोल्हापूरला पसंती देणार की पुणेकर होणार?

मंत्रिपदाबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार? याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकमंत्रिपद सतेज पाटील यांच्याकडे होते. गेल्या अडीच वर्षापासून त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. मात्र, आता सरकार कोसळल्याने ही जबाबदारी कोणाकडे जाणार याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील हेच प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी सध्या सद्यस्थितीमध्ये ते पुण्यामधील कोथरूड मतदारसंघाचे आमदार आहेत.

त्यामुळे मतदारसंघावर लक्ष ठेवण्यासाठी ते पुण्याचे पालकमंत्री स्वीकारतात की कोल्हापूरला प्राधान्य देतात? याची उत्सुकता आहे. जिल्ह्यामध्ये भाजपचे अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. धनंजय महाडिक खासदार झाल्याने महाडिक गट आणि भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. चंद्रकांत पाटील पालकमंत्रिपद स्वीकारताना ते कोल्हापूरला प्राधान्य देतात की पुण्याचा विचार करतील याबाबतही उत्सुकता आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात एकही भाजप आमदार नाही. आगामी काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तसेच मनपा निवडणूक सुद्धा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी पालकमंत्रिपदासाठी कोल्हापूर निवडतात की पुणेकर होतात याची चर्चा रंगली आहे. 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget