Kolhapur Accident Video : कोल्हापुरात थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल; कारच्या धडकेत अवघ्या सेकंदात तरुण हवेत उडाला
Kolhapur Accident Video : ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कोल्हापूर : राज्यात हिट अँड रनची मालिका सुरुच असतानाच आता कोल्हापुरातील (Kolhapur Accident Video) अंगावर शहारे आणणारा अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोल्हापुरातील उचगाव रोडवरील घाडगे पाटील इंडस्ट्रीज कंपनीबाहेर कामावर जात असताना तरुणाला भरधाव कारने मागून धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की धडक बसल्यानंतर तरुण हवेत उडाला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अपघात झाला
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 28 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.20 च्या सुमारास घडली. दरम्यान, कोल्हापुरातील उचगाव रोडवरील घाडगे पाटील इंडस्ट्रीज कंपनीबाहेर भीषण अपघात झाला. 24 वर्षीय रोहित सखाराम हप्पे रात्रपाळीसाठी पायी जात होता. कार्यालयापासून काही अंतरावर असताना एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Vande Bharat Express : देशात 'वंदे भारत' एक्स्प्रेसची शंभरी पार; कोल्हापूरला फक्त आश्वासनाचं 'गाजर' दाखवणार आहेत का? #kolhapur #VandeBharatExpress @dbmahadik @ShahuChhatrpati @satejp @mrhasanmushrif @parshrampatil12 https://t.co/SSy5aJXgCg
— ABP माझा (@abpmajhatv) August 31, 2024
अपघाताचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना धडक दिली. टक्कर इतकी जोरदार होती की रोहित हवेत उडाला. रोहितच्या डोक्याला आणि दोन्ही पायाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात निवेदनही आले आहे. सध्या अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शांतता! पोलिस तपास सुरु आहे; जयदीप आपटे सापडेना, विशाळगड दंगलीतील दोन मुख्य आरोपी सुद्धा अजूनही 'मोकाट'! #vishalgad #kolhapur #shivajimaharajstatue @parshrampatil12 https://t.co/wjC31x8AQG
— ABP माझा (@abpmajhatv) August 31, 2024
इतर महत्वाच्या बातम्या