(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याचा मुहूर्त ठरला; 'या' दिवशी खात्यात पैसे जमा होणार
PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 13 वा हप्ता या महिन्यात बळीराजाच्या खात्यात जमा होणार आहे.
Kolhapur News : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) तेरावा हप्ता या महिन्यात बळीराजाच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेतंर्गत तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आधार सीडिंग प्रलंबित लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग ई-केवायसी (eKYC PMKisan) करुन घ्यावे, त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी अथवा बँक खाते आयपीपीबीमध्ये (इंडियन पोस्ट पेमेंट बँक) भारतीय डाक विभागामार्फत उघडण्यात यावेत. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी (EKYC) झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन ई केवायसी पूर्ण करुन घ्यावे अथवा त्यासाठी महा ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी किंवा त्या शेतकऱ्यांनी बँक खाती इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये उघडावीत, असे आवाहन कोल्हापूरचे (Kolhapur News) निवासी उपजिल्हाधिकारी तथा पीएम किसान योजनेचे नोडल अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबीमध्ये (इंडियन पोस्ट पेमेंट बँक) नव्याने उघडल्यानंतर पुढील 48 तासांमध्ये ती आधार संलग्न होऊन सक्रिय होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. सर्व प्रयत्न करुनही ई-केवायसी होत नसेल तरच पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थांनी बँक खाती आयपीपीबीमध्ये (इंडियन पोस्ट पेमेंट बँक) उघडण्यात यावीत म्हणजे कोणताही लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असेही जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते. शेतकर्यांना सन्माननीय जीवनासाठी मदत म्हणून ही योजना सुरु झाली. या योजनेच्या लाभार्थ्यांचे संपूर्ण आर्थिक दायित्व केंद्र सरकार उचलते.
आपला स्टेटस कसा चेक कराल?
- pmkisan.gov.in ला भेट द्या.
- होमपेजवरील 'Farmers Corner' सेक्शन विभागांतर्गत 'Beneficiary Status' पर्याय निवडा.
- नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका
- 'डेटा मिळवा' वर क्लिक करा.
- हप्त्याची स्थिती कळेल.
यांना लाभ मिळणार नाही
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे EKYC पूर्ण केले नाही त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. पीएम किसान वेबसाईटनुसार, पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधता येईल. eKYC ची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी होती.
इतर महत्वाच्या बातम्या