Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार; माघारीसाठी आज अखेरचा दिवस
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींमधील थेटर सरपंच आणि सदस्य निवडणूकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. अर्ज माघारीसाठी आज अखेरचा दिवस आहे.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींमधील थेटर सरपंच आणि सदस्य निवडणूकीचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. अर्ज माघारीसाठी आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे आज सायंकाळी गावांमधील लढतीवर शिक्कामोर्तब होईल. सर्वच तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून विधानसभेसाठी सुद्धा डाव टाकले जात आहेत. त्यामुळे ताकदीचा उमेदवार शोधून त्यालाच ताकद देण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नेत्याची पळापळ सुरु आहे.
दरम्यान, आज चिन्हे वाटप केली जाणार असून मतदान 18 डिसेंबर, तर मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. दरम्यान, ग्रामपंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने महिला वर्गही मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात आहे.
टोकाच्या ईर्ष्येने अर्ज दाखल
कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडीत भाजपचा पहिला थेट सरपंच बिनविरोध निवडून आला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर छाननीमध्ये बहुतांश ठिकाणी किरकोळ अपवाद वैध ठरले आहेत. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी तसेच सदस्यपदासाठी टोकाच्या ईर्ष्येने अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे गेल्या 24 तासांपासून लढती सुकर करण्यासाठी अनेक रात्रीचा दिवस करण्यात आला आहे.
कोल्हापूर शहराच्या वेशीवरील तसेच जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे गटगट मजबूत होण्यासाठी विद्यमान आमदार तसेच माजी आमदारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे उत्साहींना शांत करण्यासाठी चांगलीच कसरत सुरु आहे. थेट सरपंचपदासाठी दाखल झालेल्या अर्जांची संख्या पाहता अनेक गावांमध्ये बहुरंगी लढती होतील, अशीच चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात (Kolhapur District Gram Panchayat Election) 474 ग्रामपंचायतींमध्ये 2677 सरपंचपदासाठी, 16 हजार 691 अर्ज सदस्यपदासाठी दाखल झाले आहेत. करवीर तालुक्यात 53 ग्रामपंचयतींमध्ये 374 सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. राधानगरी तालुक्यात 66 ग्रामपंचायतींसाठी 385 अर्ज आले आहेत. करवीर तालुक्यातील ग्रामपंचायती कोल्हापूर दक्षिण आणि करवीर मतदारसंघात विखुरल्या गेल्या आहेत.
शाहूवाडी तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी 204 अर्ज आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील 50 तालुक्यातील 260 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठी 303 अर्ज आहेत. शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींसाठी 122 अर्ज आहेत. गगनबावडा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी 81 अर्ज दाखल आहेत. कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी 169 अर्ज दाखल झाले आहेत. आजरा तालुक्यात 36 ग्रामपंचायतींसाठी 169 अर्ज दाखल आहेत. चंदगडमधील 40 ग्रामपंचायतींसाठी 170 अर्ज दाखल झाले आहेत. (Kolhapur District Gram Panchayat Election)
इतर महत्वाच्या बातम्या