एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' दोन तालुक्यांमध्ये सरपंचपदासाठी सर्वाधिक चुरस!

कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी तसेच सदस्य पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी चुरस दिसून आली.

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी तसेच सदस्य पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी चुरस दिसून आली. जिल्ह्यातील करवीर आणि राधानगरी तालुक्यात सरपंचपदासाठी सर्वाधिक चुरस असल्याचे दाखल झालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. 

ऑनलाईन खोळंबा झाल्यानंतर ऑफलाईन परवानगी देण्यात आल्यानंतर शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी दिसून आली. जिल्ह्यात (Kolhapur District Gram Panchayat Election) 474 ग्रामपंचायतींमध्ये 2677 सरपंचपदासाठी, 16 हजार 691 अर्ज सदस्यपदासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, दाखल अर्जांची छाननी आज होत आहे. बुधवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे. 7 डिसेंबर रोजी दुपारी तीननंतर चिन्हे वाटप केली जातील. मतदान 18 डिसेंबर, तर मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. दरम्यान, ग्रामपंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महिला वर्गही मोठ्या प्रमाणात दिसून आला.

सरपंचदासाठी सर्वस्व पणाला

गावचे राजकारण हे स्थानिक तसेच गल्लीतील मुद्यांपासून ते बांधाला बांध लागून असल्यास त्याचाही वजावटा निवडणुकीत काढला होता. त्यामुळे भावनेचं राजकारण सर्वाधिक केलं जातं. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरवत शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक चुरस करवीर आणि राधानगरी तालुक्यात आहे. 

करवीर तालुक्यात 53 ग्रामपंचयतींमध्ये 374 सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. राधानगरी तालुक्यात 66 ग्रामपंचायतींसाठी 385 अर्ज आले आहेत. करवीर तालुक्यातील ग्रामपंचायती कोल्हापूर दक्षिण आणि करवीर मतदारसंघात  विखुरल्या गेल्या आहेत.  

सरपंचपदासाठी अन्य तालुक्यातील काय स्थिती?

शाहूवाडी तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी 204 अर्ज आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील 50 तालुक्यातील 260 जणांनी अर्ज  दाखल केले आहेत. हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठी 303 अर्ज आहेत. शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींसाठी 122 अर्ज आहेत. गगनबावडा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी 81 अर्ज दाखल आहेत. कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी 169 अर्ज दाखल झाले आहेत. आजरा तालुक्यात 36 ग्रामपंचायतींसाठी 169 अर्ज दाखल आहेत. चंदगडमधील 40 ग्रामपंचायतींसाठी 170 अर्ज दाखल झाले आहेत. ( Kolhapur District Gram Panchayat Election)

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mamta Kulkarni takes 'sanyaas' at Mahakumbh : ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभ मेळ्यामध्ये स्वीकारली संन्यासाची दीक्षा100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 January 2025 ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 24 January 2025Mumbai Women Not Secure News : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत रिक्षा चालकाकडून तरुणीवर अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Embed widget