एक्स्प्लोर

Paris Olympics 2024: जिंकलंस तोडलंस मर्दा! स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकचं मैदान मारताच सतेज पाटलांची मोठी घोषणा

Paris Olympics 2024: स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकचं मैदान मारताच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटलांनी त्याच्यावर कौतुकाची थाप देत मोठी घोषणा केली आहे.

Paris Olympics 2024 Maharashtra Athletes Swapnil Kusale: कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे  (Swapnil Kusale) या नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळवणारा स्वप्नील कुसळे  (Swapnil Kusale) पहिला खेळाडू ठरला आहे. कोल्हापूरातील नेमबाज स्वप्नील हा मध्य रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टर आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून ते मध्य रेल्वे यांच्यापासून अगदी जनसामान्य देखील त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना दिसत आहे. अशातच स्वप्नील कुसाळेने  (Swapnil Kusale) ऑलिम्पिकचं मैदान मारताच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटलांनी (Satej Patil) त्याच्यावर कौतुकाची थाप देत मोठी घोषणा केली आहे.

सतेज पाटलांनी (Satej Patil) आणि त्यांच्या पुतण्याने ऋतुराज पाटील यांनी मिळून स्वप्नील कुसाळेचं  (Swapnil Kusale) कौतुक करत त्याला 5 लाख रूपयांचा इनाम जाहीर केला आहे. यासंबधीची पोस्ट सतेज पाटलांनी आपल्या सोशल मिडीया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती शेअर केली आहे. यावेळी त्यांनी "ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरकर चमकला! स्वप्नील सुरेश कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन्स स्पर्धेत कांस्य पदक जिंकून आपल्या शहराचा आणि देशाचा अभिमान वाढवला आहे. कोल्हापूरच्या क्रीडा समुदायासाठी आणि संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे" असं लिहलं आहे. "त्याचबरोबर स्वप्नीलला 5 लाखांचे इनाम जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे", असंही म्हटलं आहे. 

भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्य पदक आहे. स्वप्नील कुसाळे  (Swapnil Kusale) हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आहे.

कोण आहे स्वप्नील कुसाळे

नेमबाज स्वप्नील कुसाळे  (Swapnil Kusale) कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. 6 ऑगस्ट 1995 मध्ये जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्नीलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने 12वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला  (Swapnil Kusale) महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Embed widget