(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Shivsena : सुनील मोदी, रविकिरण इंगवले यांच्याकडे कोल्हापूर शहरप्रमुखपदाची जबाबदारी
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता पक्षबांधणीवर भर दिला आहे. 40 आमदार शिंदे गटात गेल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी निवडी नव्याने सुरु केल्या आहेत.
Kolhapur Shivsena : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता पक्षबांधणीवर भर दिला आहे. पक्षातील 40 आमदार शिंदे गटात गेल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी निवडी नव्याने सुरु केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी नव्याने जाहीर करण्यात आले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. माजी नगरसेवक सुनील मोदी आणि रविकिरण इंगवले यांच्याकडे शहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सुनील मोदी मोदी यांच्याकडे कोल्हापूर उत्तर विधानसभा तर रविकिरण इंगवले यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण शहर विधानसभा शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युवा पदाधिकारी हर्षल सुर्वे यांच्याकडे शहर समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शहर संघटकपदी माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे (कोल्हापूर उत्तर विधानसभा) व प्रीती क्षीरसागर (कोल्हापूर दक्षिण विधानसभा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाप्रमुखपदी पोपट दांगट (कोल्हापूर दक्षिण विधानसभा), अवधूत साळोखे (कोल्हापूर दक्षिण विधानसभा) यांची नियुक्ती केली आहे.
राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आबिटकर शिंदे गटात
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर त्यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर त्यांच्या गटात सामील झाले आहेत. अपक्ष आमदार आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेले राजेंद्र पाटील यड्रावकरही शिंदे गटात गेले आहेत. या तिघांविरोधात जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एकत्र येत त्यांच्या निवासस्थानी तसेच घरावर मोर्चा काढला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur Rain Update : पंचगंगेच्या पाणीपातळीत 24 तासात 10 फुटांनी वाढ , जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली
- Daulat Desai : मास्क नाही, तर प्रवेश नाही हे घोषवाक्य देणारे कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दौलत देसाईंचा प्रशासकीय सेवेचा राजीनामा!
- Kolhapur News : प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर, सत्ताधारी राजाराम वरुटे गटाचा पराभव