Kolhapur News : प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर, सत्ताधारी राजाराम वरुटे गटाचा पराभव
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत सत्तांतर झाले आहे. राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी पॅनेलने सत्ताधारी राजाराम वरुटे गटाचा पराभव केला. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसाठी रविवारी पार पडले होते.
Kolhapur News : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत सत्तांतर झाले आहे. राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी पॅनेलने सत्ताधारी राजाराम वरुटे गटाचा पराभव केला. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसाठी रविवारी पार पडले होते.एकूण मतदानापैकी 97.73 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसणार का ? याची चर्चा रंगली होती. निकाल समोर आल्यानंतर याचीच प्रचिती आली आहे.
गेल्या 14 वर्षापासून सत्तेत असलेल्या राजाराम वरुटे गटाचा पराभव झाला आहे. राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी पॅनेलने विजय खेचून आणला आहे. या पॅनेलमध्ये शिक्षक समिती, शिक्षक संघ थोरात गट आणि कास्ट्राईब गटाने आघाडी केली होती.
विरोधी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष जोतिराम पाटील व शिक्षक संघाचे थोरात गट रवी पाटील आदींच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीने एकतर्फी विजयी मिळवला. शिक्षक बँकेच्या 17 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात होते.
प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ पॅनेल, शिक्षक संघाचे (थोरात गट) जिल्हाध्यक्ष रवी पाटील, समितीचे जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक पॅनेल’ व ‘पुरोगामी’चे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘पुरोगामी, संघ, समिती परिवर्तन पॅनेल अशी तिरंगी लढत झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या