Kolhapur Crime : हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या वैभव पाटीलची आत्महत्या
कमांडो हाफ मॅरेथॉन 2022 या स्पर्धेच्या आयोजनाच्या नावाखाली पैसे गोळा करून लाखोची फसवणूक केलेल्या वैभव पाटीलने आत्महत्या केली आहे. वैभवने पन्हाळा तालुक्यातील आपल्या गावी आत्महत्या केली.
Kolhapur Crime : कमांडो हाफ मॅरेथॉन (kamando half marathon 2022) या स्पर्धेच्या आयोजनाच्या नावाखाली पैसे गोळा करून लाखोची फसवणूक केलेल्या वैभव पाटीलने (Suicide of Vaibhav Patil) आत्महत्या केली आहे. वैभवने पन्हाळा तालुक्यातील आपल्या गावी आत्महत्या केली. वैभवने कमांडो हाफ मॅरेथॉन 2022 या स्पर्धा आयोजनांच्या नावाखाली पैसे गोळा केले होते. दरम्यान, स्पर्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी वैभवच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभवने आज कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानात स्पर्धा होणार असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात जाहिरात केली होती. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून लाखो बक्षिसांचा वर्षाव करणार असल्याचे जाहीर केले होते. स्पर्धेसाठी देशभरातून दीड हजारांवर स्पर्धक आले होते. मात्र, त्या सर्वांची फसवणूक झाल्याने पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणाला आयोजक वैभव पाटीलने आत्महत्या केल्याचं समोर आल्याने धक्कादायक वळण लागलं आहे. वैभवचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पन्हाळा तालुक्यातील तिरपणमध्ये त्याने आत्महत्या केली. हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी स्पर्धकांनी नोंदणी फी घेतली होती. ती घेवून तो फरार झाल्याचा आरोप त्याच्यावर होता. स्पर्धकांनी फोन केल्यानंतर फोनही बंद होता.
कोल्हापूरमध्ये विविध गटातील हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. 16 ऑक्टोबर म्हणजेच आज ही हाफ मॅरेथॉन होणार म्हणून महाराष्ट्रासह देशभरातून स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या