एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kolhapur Bajar Samiti Election : कोल्हापूर बाजार समितीसाठी चुरशीने मतदान, निकालाची उत्सुकता शिगेला; जयसिंगपूर बाजार समितीसाठी उद्या मतदान

या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी व शिवशाही शेतकरी विकास परिवर्तन आघाडी या दोन पॅनेलमध्ये दुरंगी लढत होत आहे. एकूण 18 जागांसाठी 51 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालं आहे.

Kolhapur Bajar Samiti Election : शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 70 केंद्रांवर चुरशीने 92.33% मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे उद्या (30 एप्रिल) होणाऱ्या निकालाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे. या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी व शिवशाही शेतकरी विकास परिवर्तन आघाडी या दोन पॅनेलमध्ये दुरंगी लढत होत आहे. एकूण 18 जागांसाठी 51 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालं आहे. 480 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडली एकूण 21,600 मतदारांची मतदान होते. या निवडणुकीसाठी 1175 विकास संस्थेतील 14 हजार 133, तर 603 ग्रामपंचायतीमधील 5 हजार 733 सभासद मतदानासाठी पात्र आहेत. विकास सेवा संस्था गटातून 11, ग्रामपंचायत गटातून चार, व्यापारी-अडते गटातून दोन तर हमाल-तोलाईदार गटातून एक जागा आहे. 

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रानुसार करवीर, भुदरगड, कागल, राधानगरी, शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यात मतदान पार पडले. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रानुसार करवीर, भुदरगड, कागल, राधानगरी, शाहूवाडी व पन्हाळा या तालुक्यातील मतदान झाले. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था, व्यापारी अडते, माथाडी अशा गटामधील उमेदवारांसाठी मतदान झाले. त्यांना ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्था सदस्य, व्यापारी अडते सदस्य, माथाडी सदस्यांनी मतदान केले. शेती उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 21 हजार 988 मतदारांपैकी 20 हजार 280 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे शंभर टक्के मतदान झाले तर उर्वरित सर्व ठिकाणी 92 ते 95 टक्के मतदान झाले.

जयसिंगपूर बाजार समितीसाठी उद्या मतदान

दरम्यान, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहे. उर्वरित 11जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सेवा संस्था व ग्रामपंचायत या दोन गटातील 2 हजार पाचशे सभासद मतदार आहेत. शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय, जयसिंगपूर येथील कुमार विद्या मंदिर येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्रे व कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालय येथे तीन मतदान केंद्रे असून एकूण सात केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार असून सायंकाळी पाचनंतर मतमोजणी केली जाणार आहे.

गडहिंग्लज बाजार समिती बिनविरोध

दरम्यान, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे अनेक दशकांमध्ये प्रथमच बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनी बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. त्यामुळे निवडणूक खर्च वाचला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल 169 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Embed widget