SL vs NED Match Report: श्रीलंकेचा वर्ल्डकपमधील पहिला विजय; नेदरलँडची कडवी झुंज अपयशी
नेदरलँड्सचा पराभव केल्यानंतर श्रीलंकेच्या संघाला 1 स्थानाचा फायदा झाला आहे. वास्तविक, याआधी श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत तळाच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर होता, मात्र या विजयानंतर तो नवव्या स्थानावर आला.
लखनौ : श्रीलंकेने नेदरलँड्सचा 5 गडी राखून पराभव केला. त्यामुळे श्रीलंकेनं 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पहिला विजय मिळवला. श्रीलंकेसमोर 263 धावांचे लक्ष्य होते. श्रीलंकेच्या संघाने 48.2 षटकात 5 विकेट गमावत 263 धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेच्या विजयाची हिरो सादिरा समरविक्रमा ठरला. सदीरा समरविक्रमा 107 चेंडूत 91 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले. नेदरलँडसाठी आर्यन दत्त हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. आर्यन दत्तने 10 षटकांत 44 धावांत 3 खेळाडू बाद केले. याशिवाय पॉल वॉन मीकेरेन आणि कॉलिन अकरमन यांना 1-1 असे यश मिळाले. तत्पूर्वी, नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
"Really happy to finish the game. We needed a win"
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 21, 2023
Sadeera Samarawickrama is the Player of the Match in Lucknow 🙌https://t.co/skDRqJ30oQ #NEDvSL #CWC23 pic.twitter.com/AyPhiBIVmB
दुसरीकडे, वर्ल्डकप कोणीही जिंकेल पण नेदरलँडची कामगिरी निश्चितच उजवी झाली आहे. मागील सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला तगडा हादरा दिल्यानंतर आजही त्यांनी बाजी पलटवत श्रीलंकेविरुद्धही दमदार कामगिरी केली. नेदरलँडने श्रीलंकेसमोर 263 धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेदरलँडचा संघ 49.4 षटकांत सर्वबाद 262 धावांवर आटोपला. मात्र, एकवेळ 6 फलंदाज 91 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते, मात्र असे असतानाही संघाला 262 धावांपर्यंत मजल मारली.
विश्वचषकाच्या इतिहासातील नेदरलँड्सची ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. नेदरलँड्ससाठी एंजेलब्रँडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 82 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. व्हॅन विकने 75 चेंडूत 59 धावांचे योगदान दिले. याशिवाय अकरमनने 32 चेंडूत 29 धावा केल्या. मात्र, नेदरलँडच्या बहुतांश फलंदाजांनी निराशा केली. नेदरलँड संघाच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.