(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Shivsena : कोल्हापूरमधील बंडखोर खासदारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, कितीही बंदोबस्त लावला, तरी राजकीय वचपा काढणारच!
खासदार संजय मंडलिक (sanjay mandlik) आणि खासदार धैर्यशील माने (Dhairyashil mane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णयानंतर कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
Kolhapur Shivsena : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक (sanjay mandlik) आणि खासदार धैर्यशील माने (Dhairyashil mane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी या दोन्ही खासदारांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.
खासदार संजय मंडलिक यांच्या माध्यमातून रेल्वे बोर्डावरचे सदस्य म्हणून नियुक्ती झालेल्या शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आंध्र प्रदेशमध्ये राजकीय सत्तापालटानंतर आज पुन्हा एकदा रेड्डी यांच्या कुटुंबातीलच व्यक्ती मुख्यमंत्री आहे असं म्हणत शिवसेनेमुळे आणि कोल्हापूरच्या मतदारांमुळे आपण खासदार आहात हे विसरून चालणार नाही असा सबुरीचा सल्लाही शिवसैनिकांनी दिला आहे.
घरासमोर कितीही बंदोबस्त लावा, शिवसैनिक राजकीय वचपा काढणारच
खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील घराला तगडा पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यावरून शिवसेनेचे जिल्हा समन्वयक हर्षल सुर्वे यांनी इशारा दिला आहे. घरासमोर कितीही बंदोबस्त लावला, तरी शिवसैनिक याचा राजकीय वचपा काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
धैर्यशील मानेंच्या घरासमोर तगडा बंदोबस्त बहाल!
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyashil mane) यांच्या घरासमोर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धैर्यशील माने असो किंवा संजय मंडलिक हे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. केवळ अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी इथल्या घरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Raju Shetti on GST : आता फक्त स्वस्त आहे मरण, त्याला कधी जीएसटी लावता? राजू शेट्टींचा बोचरा वार
- Kolhapur News : महाडिक कंपनीकडून खादी ग्रामोद्योगाची जागा हडपण्याचा प्रयत्न, माजी नगसेविकेचा गंभीर आरोप
- Dhairyashil mane : एकनाथ शिंदे गटात सामील होण्याच्या हालचाली सुरु होताच खासादार धैर्यशील मानेंच्या घरासमोर तगडा बंदोबस्त बहाल!