Sharad Pawar In kolhapur : शरद पवारांचा उद्यापासून चार दिवस कोल्हापुरात मुक्काम; विधानसभेच्या तोंडावर जोडण्या लावणार
Sharad Pawar In kolhapur : भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्रातील सहकारात दबदबा असलेल्या समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar In Kolhapur) उद्यापासून (2 सप्टेंबर) तब्बल चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये शरद पवारांचा कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीचा कार्यक्रम असणार आहे. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्रातील सहकारात दबदबा असलेल्या समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.
शांतता! पोलिस तपास सुरु आहे; जयदीप आपटे सापडेना, विशाळगड दंगलीतील दोन मुख्य आरोपी सुद्धा अजूनही 'मोकाट'! #vishalgad #kolhapur #shivajimaharajstatue @parshrampatil12 https://t.co/wjC31x8AQG
— ABP माझा (@abpmajhatv) August 31, 2024
3 सप्टेंबर रोजी कागलमध्ये गैबी चौकामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत घाटगे तुतारी फुंकणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समरजित घाटगे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम अधिकाधिक दमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
Vande Bharat Express : देशात 'वंदे भारत' एक्स्प्रेसची शंभरी पार; कोल्हापूरला फक्त आश्वासनाचं 'गाजर' दाखवणार आहेत का? #kolhapur #VandeBharatExpress @dbmahadik @ShahuChhatrpati @satejp @mrhasanmushrif @parshrampatil12 https://t.co/SSy5aJXgCg
— ABP माझा (@abpmajhatv) August 31, 2024
शरद पवार चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करणार आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडलं आहे. ते केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करतील. सायंकाळी ते कागलमध्ये मेळाव्यासाठी पोहोचतील. बुधवारी 4 सप्टेंबर रोजी भारत पाटणकर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात शाहू सभागृहात सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे. गुरुवारी पतंगराव कदम यांचा पुर्णाकृती पुतळ्याच्या लोर्कापणासाठी ते सांगलीमध्ये जातील. तो कार्यक्रम करून ते बारामतीकडे प्रस्थान करतील.
इतर महत्वाच्या बातम्या