Kolhapur News : कोल्हापूरसाठी राम नवीन नाही, छत्रपती घराण्यात आजपर्यंत 4 छत्रपतींना राजाराम नाव; शाहू महाराजांकडून आठवणींना उजाळा
छत्रपती घराण्यात आजपर्यंत 4 छत्रपतींना राजाराम हे नाव देण्यात आल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत दिलेल्या नावांवरून छत्रपती घराण्याची रामभक्ती दिसून येत असल्याचे शाहू महाराज म्हणाले.
कोल्हापूर : अयोध्येत (Ayodhya) राम मंदिर अभिषेक मोठ्या उत्साहात पार पडला. यामुळे देशभरात भक्तीमय वातारवर होते. कोल्हापूर जिल्ह्यातही (Kolhapur) प्रत्येक गावात राम मंदिर अभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापुरात छत्रपती चॅरिटेबल देवस्थानकडून अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्त अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीमंत छत्रपती शाहू छत्रपती महाराज यांच्यासह संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती तसेच सर्वच छत्रपती घराण्यातील सदस्यांनी एकत्र येत आरती आणि पूजा केली.
कोल्हापूरसाठी राम नवीन नाही
यावेळी शाहू महाराज यांनी कोल्हापूरसाठी राम नवीन नाही, अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय छत्रपती घराण्यात आजपर्यंत 4 छत्रपतींना राजाराम हे नाव देण्यात आल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत दिलेल्या नावांवरून छत्रपती घराण्याची रामभक्ती दिसून येत असल्याचे ते म्हणाले. महाराज पुढे म्हणाले की, राम मंदिर हा आनंदाचा क्षण आहे, मी 1956 साली 8 वर्षांचा असताना अयोध्येत गेलो होतो, अशीही आठवण त्यांनी सांगितली. त्यानंतर जाण्याचा योग आला नाही, पण भविष्यात आला तर नक्की जाईन असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, अयोध्येत (Ayodhya) प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला आहे. मंदिरासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेल्या अनेकांची प्रतीक्षा सुद्धा संपली आहे. रामलला गाभाऱ्यात बसवण्यात आले आहेत. रामललाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात हिऱ्या-मोत्याचा हार आहे. याशिवाय कानात कुंडल आहेत. हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण आहे. राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्भगृहात राम लल्लाची पूजा केली आणि त्यानंतर मूर्तीची विधीवत पूजा पूर्ण झाली. यानंतर पीएम मोदींनी रामललाची आरती केली आणि यादरम्यान यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, संघ प्रमुख मोहन भागवत हेही गाभाऱ्यात उपस्थित होते.
मूर्ती शालिग्राम खडकापासून बनवली
ही मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी शालिग्राम खडकापासून बनवली आहे. तो काळ्या रंगाचा दगड आहे. धर्मग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये शालिग्राम पाषाण हे भगवान विष्णूचे रूप मानले गेले आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले गेले आहेत. शालिग्राम खडक हजारो वर्षे जुना आहे. हे पाणी प्रतिरोधक आहे. चंदन लावल्याने मूर्तीच्या चकाकीवर परिणाम होत नाही.
नखापासून टोकापर्यंत असलेल्या रामललाच्या मूर्तीची एकूण उंची 51 इंच असून तिचे वजन सुमारे 200 किलो आहे. रामललाची जुनी मूर्ती अयोध्येच्या पंचकोशी परिक्रमेला प्रदक्षिणा घालून येथील मंदिरांमध्ये नेण्यात आली. यानंतर ती मूर्तीही नवीन मूर्तीसोबत राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या