एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'

Kolhapur News: गर्भलिंग निदान प्रकरणात डॉ. युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता आणखी सहा जणांना इस्पूर्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Illegal Fetal Sex Determination Racket in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिद्रीमधील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील डॉ. युवराज पाटीलला बेड्या ठोकल्यानंतर सहा एजंटाना देखील अटक केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या डॉक्टराने अनेक भागात एजंटांचं जाळ पसरवून मुलीची गर्भातच हत्या केल्याचे समोर आलं आहे. इतकंच नाही तर या दुष्यकृत्यातून त्याने लाखो रुपयांची माया जमवली असल्याचे देखील पोलीस तपासात समोर येत आहे. 

गर्भलिंग निदान प्रकरणात डॉ. युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता आणखी सहा जणांना इस्पूर्ली पोलिसांनी अटक केली आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा दिनकर कांबळे आणि नंदा ईश्वरा गुरव यांच्यासह एजंट बाजीराव तोकडे, विक्रम आनंदा पाटील, सुखदेव पाटील, सुनील सदाशिव गुरव यांना अटक केली आहे. या गोरखधंद्यातून डॉ. युवराज पाटीलने बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे कृत्य करून लाखो रुपयांची माया जमवली आहे. इस्पुर्ली पोलिसांनी डॉ. युवराज पाटील मालकीच्या आलिशान फॉर्च्यूनर आणि थाररॉक्स कार जप्त केल्या आहेत. 

श्रद्धा हॉस्पिटलमध्ये राजरोस गर्भलिंग निदान 

डॉक्टर युवराज पाटील बिद्रीमधील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये राजरोस गर्भलिंग निदान करत होता. हजारो रुपये घेत हॉस्पिटलमध्ये आईच्या पोटातच मुलीच्या हत्या करत गर्भपात करत होता. इस्पूर्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावून तपासला सुरुवात केल्यानंतर अनेक सहभागी आरोपीची नावे समोर येत आहेत. पोलिसांनी यापूर्वी डॉ. युवराज पाटील आणि संभाजी शिंदे यांना अटक करून लाखो रुपये जप्त केले होते. आता या प्रकरणाचा तपास करत असताना आणखी सहा जणांचा सहभाग दुष्कृत्यात आढळून आला.  

या एजंटांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. पोलिसांना एजंटांच्या मोबाईलमधील अनेकांची नावे समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने एजंटांनी कोणामार्फत गर्भलिंग निदान करण्यासाठी डॉ. युवराज पाटीलकडे पेशंट आले, त्यांच्याकडून किती रुपये मिळाले याची सर्व माहिती असणारे डिजिटल पुरावे उपलब्ध झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत युवराज पाटीलवर गर्भलिंग निदान केल्याचा गुन्हा दाखल केला होता, पण आता नव्याने बेकायदेशीर गर्भपात केल्या प्रकरणी अधिकचा गुन्हा दाखल होणार आहे आहे. 

भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था 

या संपूर्ण रॅकेटमध्ये गर्भपातानंतर भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. युवराज पाटील हा गर्भपात केल्यानंतर काही ठराविक महिलांच्या माध्यमातून हे भ्रूण नष्ट करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या कामासाठी संबंधित महिलांना प्रत्येकी ठराविक रक्कम दिली जात होती. त्यामुळे पोलीस गर्भपात केलेले भ्रूण नेमके कुठे टाकले गेले किंवा कुठे पुरले गेले याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Embed widget