Saurabh Shetti : पितृछत्र हरपलेल्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सौरभ शेट्टींनी उचलली
स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सौरभ शेट्टी यांनी वडिलांचा आधार हरपललेल्या शेतमजुराच्या मुलाची संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली आहे. याबाबत विक्रम पाटील यांनी माहिती दिली.
Saurabh Shetti : दोन महिन्यांपूर्वी वडिलांचा आधार हरपललेल्या शेतमजुराच्या मुलाची स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सौरभ शेट्टी यांनी संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली आहे. याबाबत विक्रम पाटील यांनी माहिती दिली.
दोन महिन्यांपूर्वी शेतात काम करत असताना तिरपण (ता. पन्हाळा) येथील काम करत असताना अंगावर भिंत पडून युवराज पाटील यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे आठवीमध्ये शिकत असलेल्या अथर्व पाटीलचे पितृछत्र हरवल्याने शैक्षणिक वाटचाल अतिशय बिकट झाली होती. अथर्वची आई आणि आजी या दोघीही मोलमजुरी करतात.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विक्रम पाटील यांनी सौरभ शेट्टी यांच्याकडे पाटील कुटुबियांची परिस्थिती मांडली. अथर्वच्या भवितव्याचा विचार करून स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सौरभ शेट्टी यांनी जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. त्याला सर्व शैक्षणिक साहित्यही भेट देण्यात आलं आहे. त्याच्या पदवीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च विद्यार्थी परिषदेमार्फत सौरभ शेट्टी हे पाहणार आहेत. यावेळी विक्रम पाटील, विनायक माळी, ऋषी गायकवाड आदी उपस्थित होते.
यापूर्वीही सौरभ शेट्टी यांनी दोन वर्षांपूर्वी पोर्ले (ता. पन्हाळा) येथील प्रज्ञा बजरंग घाडगे या मुलीचा शिक्षणाचा खर्च उचलत सामाजिक जबाबदारी पार पाडली होती. प्रज्ञाची आता बारावी पूर्ण झाली असून आता पुढील शिक्षणाची जबाबदारी सौरभ शेट्टी यांनी घेतली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Single Plastic Use Ban : कोल्हापूर जिल्ह्यात 1 जुलैपासून प्लास्टिक बंदी, उद्योजक म्हणतात लगेच कारवाई नको
- Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील पालकमंत्रिपदासाठी कोल्हापूरला पसंती देणार की पुणेकर होणार?
- Raju Shetti : इथेनॅाल निर्मितीमध्ये गुऱ्हाळघरांना परवानगी द्या, राजू शेट्टींकडून नितीन गडकरींना साकडे