Raju Shetti : इथेनॅाल निर्मितीमध्ये गुऱ्हाळघरांना परवानगी द्या, राजू शेट्टींकडून नितीन गडकरींना साकडे
गुऱ्हाळघरांना परवानगी दिल्यास ते एकत्रित येऊन इथेनॅाल निर्मिती केल्यास ऊस उत्पादक शेतक-यांना याचा लाभ होणार असल्याने याबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली.
Raju Shetti : इथेनॅाल वापरासाठी आग्रही असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी इथेनॅाल निर्मितीमध्ये गुऱ्हाळघरांना परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
गुऱ्हाळघरांना परवानगी दिल्यास ते एकत्रित येऊन इथेनॅाल निर्मिती केल्यास ऊस उत्पादक शेतक-यांना याचा लाभ होणार असल्याने याबाबत केंद्र सरकारकडून धोरण निश्चित करण्याची मागणीही त्यांनी नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गुऱ्हाळघरांना इथेनॅाल निर्मिती करण्याची परवानगी दिल्यास ज्यावेळी गुळाचे दर कमी होतील, त्याकाळात ऊसाच्या रसापासून सिरप टू इथेनॅाल करण्यासाठी परिसरातील 8 ते 10 गुऱ्हाळधारक एकत्रित येवून टँकरने रस एकत्र केल्याने उत्पादन खर्चही कमी होईल व चांगल्या पध्दतीने इथेनॅाल निर्मिती करू शकतील, असेही राजू शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे.
त्याचबरोबर दिवसेंदिवस ऊसतोडणीचा प्रश्न गंभीर होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने पुढील हंगामापासून उसतोडणी मशिनसाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देवून मशिनद्वारे उसतोडीसाठी चालना देण्याची मागणी शेट्टी यांनी निवेदनात केली आहे.
दरम्यान, मंत्री गडकरी यांनी दोन्ही मागण्या योग्य असल्याचे म्हटले आहे. याबाबत तातडीने केंद्र सरकारकडून ऊपाययोजना करण्यासंदर्भात मंत्री गडकरी यांच्याकडून तत्काळ संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Shivaji University election 2022 : शिवाजी विद्यापीठ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरु
- Rajendra patil yadravkar vs shivsena : यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांच्या राड्यानंतर 200 जणांवर गुन्हे दाखल
- Prakash Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा एल्गार सुरुच, आता प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा
- Rajendra Patil Yadravkar : मी लेचापेचा नाही! जयसिंगपुरातील तुफानी राड्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकरांचा इशारा