Kolhapur : पुलाची शिरोलीत महाडिक गटाकडून सतेज पाटील गटाचा सुफडा साफ; तब्बल 17 जागा अन् सरपंचपदही महाडिक गटाकडे
Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे.
Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल 18 जागांपैकी 17 जागा मिळवल्या आहेत. सरपंचपदासाठी पद्मजा कृष्णात करपे या 4 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या.
शिरोली ग्रामपंचायतीसाठी सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी आणि विरोधी महाडिक आघाडी अशी थेट दुरंगी लढत होत आहे. सरपंचपदासाठी शाहू आघाडीकडून माजी ग्रामपंचायत सदस्य रूपाली खवरे, तर महाडिक आघाडीकडून पद्मजा करपे रिंगणात होत्या. यामुळे पुन्हा एकदा खवरे-करपे यांच्यात तुल्यबळ सामना झाला. ग्रामपंचायतमधील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी महाडिक आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली होती.
शिरोली ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक व ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांचे हे होम ग्राऊंड आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महाडिक आघाडीकडून शाहू आघाडीने सत्ता हस्तगत केली होती.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली होती. शाहू आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी यांनी महाडिक आघाडीकडून उमेदवारी घेतली होती. कोळी यांच्या विरोधात शाहू आघाडीने राहुल खवरे यांना उमेदवारी देऊन, आव्हान उभे केले होते. शाहू आघाडीचे नेते,माजी सरपंच विठ्ठल पाटील यावेळी महाडिक आघाडीच्या व्यासपीठावर होते.
दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु आहे. जिल्ह्यातील धक्कादायक निकाल हाती येत आहेत. शिरोळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे कागल तालुक्यात तीन ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. करवीर तालुक्यातील नेर्लीत काँग्रेसचा सरपंच झाला आहे. कागल तालुक्यातील पिराचीवाडीत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इतर निकाल
- कागल तालुक्यातील बामणीत पहिला गुलाल; जाहीर सत्तांतर, मुश्रीफ गटाला धक्का, सरपंचासह राजे गटाची बाजी
- बामणी निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंडा
- करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपची बाजी; सतेज पाटील गटाला सत्तांतर करण्यात अपयश
- कसबा सांगाव ता. कागल मुश्रीफ गटाला धक्का; सरपंच पदी राजे- मंडलिक गटाची बाजी
- कोल्हापुरात ठाकरे गटाने खात खोललं; व्हनाळीत माजी आमदार संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंचपदी विजयी
- करवीर तालुक्यातील वडणगेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता; सरपंच संगीता शहाजी पाटील 4679 मतांनी यांची सरपंच पदी विजयी
- शिरोळ तालुक्यात शिंदे गटाची घोडदौड; अकिवाटमध्ये सरपंचपदाच्या वंदना सुहास पाटील उमेदवार विजयी
- खिद्रापूरमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सारिका कुलदीप कदम विजयी
- टाकवडेमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सविता मनोज चौगुले विजयी
- संभाजीपूरमधून सरपंच पदाचे शिंदे गटाचे सचिन कुडे विजयी
- हेरवाडमध्ये रेखा अर्जुन जाधव सरपंचपदी विजयी; काँग्रेस स्वाभिमानी स्थानिक आघाडी विजयी
कोल्हापूर जिल्हा
भाजप – 3 + 1+1 +1+1+1 = 8
ठाकरे गट – 1 +1+ 1 +1= 4
शिंदे गट – 3 + 1+1+1= 6
राष्ट्रवादी - 1+1+1 =3
कॉग्रेस - 1+1+ =2
इतर 1+ 2+ 3 +1 = 7
एकूण – 430/ 30